पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाच आहे. या भागाकडे समाजाचें - विशेषतः भगिनीवर्गाचें-जितकें लवकर व अधिक लक्ष जाईल, तितकें समाजसुधारणेचें पाऊल पुढें पडेल.  सारांश, ज्ञानसंग्रहाच्या व समाजाच्या प्रगतीच्या अशा दोन्ही दृष्टीनीं प्रस्तुत पुस्तकाची उपयुक्तता मोठी आहे व त्याचा जन्मही अत्यंत समयोचित झाला आहे असे मला वाटतें. हे माझे मत या प्रस्तावनेच्या द्वारें प्रांजलपणें सांगण्याची संधि मला दिल्याबद्दल व अशा उपयुक्त व परिश्रमपूर्वक लिहिलेल्या पुस्तकास प्रस्तावना लिहिण्याचा मान दिल्याबद्दल रा. 'ऋग्वेदी ' यांचे आभार मानून सुज्ञ वाचकांच्या हातीं हैं पुस्तक मी मोठ्या आनंदानें देतों.


 आनंदमंदिर,

इंदूर, ता० २८।३।१६. } बासुदेव गोविंद आपटे.