पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाच्या तत्त्वास मान दिल्याबद्दल पाश्चात्य इतिहासकार रोमन लोकांच्या शहाण- पणाबद्दल तारीफ करतात, तर तसाच प्रकार अनार्य जातींच्या संबंधांत आम- च्या आयपूर्वजांनी केल्याबद्दल त्यांच्या दूरदृष्टीचा गौरव करण्याचें सोडून त्यांच्या त्या धोरणाला अत्यंत विसदृश असें भिन्नत्वाचें धोरण आपण त्यांच्या वंशजांनीं तरी कां ठेवावें? प्रस्तुत पुस्तकाच्या विवेचनांत इतिहासकथन आणि युक्तिवाद अशीं दोन ठळक अंगे आहेत. पैकी पहिल्या म्हणजे ऐतिहासिक माहितीचे संबंधांत येथें एवढे सांगणें अवश्य आहे कीं, ही माहिती मिळविण्याचे काम लेखकानें अत्यंत परिश्रम केले आहेत. एकाच सणाचीं निरनिराळ्या प्रांतांतून निरनिराळी स्वरूप कशीं झालेली दिसत आहेत व तीं तशीं कां झालीं वगैरे संबंधांत लेखकानें दिलेली माहिती मला तर कित्येक स्थळीं अगदर्दी नवीन आढळली व ज्ञानसंग्र- हाचे दृष्टीनें पुस्तकाच्या वाचनानंतर आपणांस थोडासा तरी लाभ झाला असे वाटल्यावांचून राहिलें नाहीं. माझ्यासारखा अनुभव इतर वाचकांनाही थोड्या फार प्रमाणानें येईल व या पुस्तकानें लोकांच्या ज्ञानांत कांहीं तरी भर टाकली असें प्रत्येकास वाटेल, अशी माझी समजूत आहे. ग्रंथकर्त्यांनी दिलेली सगळीच माहिती बिनचूक आहे किंवा त्यांनी जागोजाग केलेलीं विधानें समर्थन कर ण्यासारखी आहेत असे मी ह्मणत नाहीं. उदाहरणार्थ, पृष्ठ ६५ वर हिंदूंस मूर्तिपूजेचा ओनामा बुद्धाच्या अनुयायांनींच घालून दिला,' असे एक विधान आहे. अशा प्रकारची विधानें आधाराशिवाय मोघम रीतीनें करणें बरोबर नाहीं असे मला वाटतें. कित्येक ठिकाणीं विषयविवेचनास अवश्य नसतांही तीं कर- ण्यांत आली आहेत. पण अर्शी स्थळें फार थोडीं आहेत, आणि बहुधा अशा ज्या चुका झालेल्या आढळतात, त्या निर्हेतुक असल्यामुळे क्षम्य आहेत असे मला वाटतें. विषयप्रतिपादनाचें दुसरें अंग ह्मणजे प्रत्येक सण पाळण्याच्या प्रचलित पद्धतीसंबंधानें सुचविलेल्या सुधारणा किंवा जागोजागीं बोध घेण्या- सारख्या सुचविलेल्या गोष्टी हैं होय. माझ्या मतें हा भाग अत्यंत महत्त्वाचा व जरूरीचा आहे. आर्याच्या सणांसंबंधानें ऐतिहासिक माहिती देणारी एक दोन पुस्तकें यापूर्वी मराठीत झालेली आहेत; त्यांत व प्रस्तुत पुस्तकांत जें अंतर आहे तें येथेंच आहे. रा. 'ऋग्वेदी ' यांच्या अंगच्या सारासारविचारशक्तीची व जुन्यांतला ग्राह्यांश घेऊन त्याच्या पायावर नव्या सुधारणेची इमारत उभा- -रण्याच्या इच्छेची साक्ष पटविणारा व त्यांना कसोटीला लावणारा भाग ह्मणजे