Jump to content

पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळी आपले नाडीचे ठोके हळूहळू कमी होत आहेत, शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळत आहे ही कल्पना करावयाची. या वेळी आपला श्वास-प्रश्वासही अत्यंत स्थिर ठेवणे इष्ट असते. असे ध्यान प्रतिदिन दोन वेळा करावे. याचा काल हळूहळू वाढवत कमीत कमी रोज वीस मिनिटांची दोन आवर्तने करावीत. ध्यान संपल्यावर पाहिजे तर दीर्घश्वसन करून ध्यानाबाहेर यावे.
कोलेस्टरॉल - उच्च पातळी (Hypercholesterolmia) :
 हल्ली कोलेस्टरॉल हा शब्द हृदयविकाराशी निगडीत असल्यामुळे चिंतेचा झाला आहे. त्यासंबंधी थोडा विचार करू. अशा इतर निवडक केसेसही पाहू.
 कोलेस्टरॉल हा एक तैलपदार्थ व स्टेरॉइड आहे. आपण जे सॅच्युरेटेड फॅट अन्नातून घेत असतो, त्यावर लिव्हर प्रक्रिया करते व कोलेस्टरॉल बनविते. प्राणीजन्य फॅटमध्ये कोलेस्टरॉल असते, परंतु वनस्पतिजन्य तेलात ते नसते. त्यात असतात सॅच्युरेटेड फॅटस् ज्यापासून लिव्हर कोलेस्टरॉल तयार करते. आपणा सर्वांच्या रक्तात कोलेस्टरॉल असतेच. आपली जी एक गैरसमजूत असते की तेलात कोलेस्टरॉल असल्यामुळे ते फारसे खाऊ नये व रिफाइन्ड तेलच खावे. कोलेस्टरॉल हा अत्यंत जरुरीचा घटक आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला जास्त जरुरी असते. याशिवाय बाईल ॲसिडस्, काही हार्मोन्स व व्हिटॅमिन 'डी ३' यांच्या निर्मितीसाठीही त्याची जरुरी असते. तेव्हा कोलेस्टरॉल हे शत्रू नसून मित्रच आहे. त्यात एकच दोष आहे. आपणास एवढेच माहीत असते की कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांत त्याचे थर बसतात, गुठळ्या होतात व हृदयरोग होते. पण हे का होते हे समजावून घेतले तर आपली भीती नष्ट होईल. नाहीतर तेल खाऊ नका, तूप नको, लोणी नको, साय नको या चुकीच्या संकल्पनांचे आपण बळी ठरतो.

 कोलेस्टरॉल हे शरीरात वाहत्या स्वरूपात राहिले पाहिजे तर तुंबे निर्माण होणार नाहीत. कोलेस्टरॉलचा द्रावणबिंदू ३००° फॅ. हा आहे. परंतु शरीराचे तापमान असते ९७° वा ९८° फॅ. मग कोलेस्टरॉल द्रावस्वरूपात कसे राहणार? वनस्पतितेलात लेसिथिन नावाचे फॅटी अॅसिड असते, ते हा द्रावणबिंदू १८०° इतका खाली आणते. शिवाय लायनोलिक व लायनोलेनिक ही दोन फॅटी अॅसिडस योग्य प्रमाणात असतील

२८६