Jump to content

पान:आरोग्यशास्त्र.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळाविषयक आरोग्य ( स्कूल हायजिन ) २३३ लागल्यावर कमी होतो. मस्तक भरून आल्याप्रमाणें वाटते. नेत्रगोलांच्या पापण्यांची आरक्तता, नेत्रास पाणी येणें (Blinking) दूरच्या पदार्थाकडे पाहतांना अंशतः डोळे मिटणें, डोळे चोळणे, नेत्रांत कढत पाणी व वेदना, कधीं मळमळ व वांती, तिरवेपणा, क्षोभ, मज्जातंतूशूल, सार्व- देहिक क्षीणता, बारा इंचांपेक्षां अधिक जवळ पुस्तक धरणें, वर्ण नीट न दिसणें, दुर्लक्ष व लड्डपणा इत्यादि भावना असतात. -हस्व दृष्टि (मायोपिया) :- हा विकार आठ वर्षांच्या वयाच्या पूर्वी कचित् होतो. खालच्या वर्गांतून शिक्षणाच्या वरच्या वर्गांत व दर्जात प्रवेश होत जातांना हा विकार अधिकाधिक दृष्टीस पडतो. म्हणून विद्यार्थीदशेचा दृष्टीवर अनिष्ट परिणाम घडतो हे सिद्ध होतें, झांत नेत्रांची पुढून मागे लांबी अधिक असते व रेटिना पडदा अधिक दूर असतो. म्हणून गोलांतर कांचेचे चष्मे उपयोगी पडतात. जीं मुलें नाजूक असतात, विशेषत: ज्यांच्या स्नायूंचा व मेंदूचा संज अशक्त असतो, अशांना हा विकार होतो. हा आनुवंशिक आहे. शीघ्र ज्वरानंतरची क्षीणता, अशुद्ध हवा, वाईट संवयी, व जाम्रण हीं प्रावण्य कारणे आहेत. लिहितांवाचतांना वेड्यावाकड्या आसनांत बसण्यानें हस्व दृष्टी होते. -हस्व दृष्टीच्या रोग्यांचे नेत्र उंच उंचलून आल्याप्रमाणे दिसतात व बहुधा रुंद दिसतात. लंबदृष्टि (लॉंग साइट) -नेत्राची लांबी कमी असणें व रेटिना पडदा सन्निध असणें ह्या कारणांनी हा विकार होतो. म्हणून गोल- बाह्य चष्मे लागतात. लहान मुलांत हा विकार फार आढळण्यांत येतो. शाळेत डोळ्यांवर सतत ताण पडतो. व हस्व दृष्टीच्या मुलांनी डोळ्यां- शेजारीं पुस्तक नेल्याने दृष्टीची अडचण दूर होते. तसा प्रकार ह्यांत नसतो. बारीक खोल डोळे, आकुंचित बाहुल्या, लालसर व आर्द्र नेत्र ह्रीं ह्या विकाराची चिन्हें आहेत.