Jump to content

पान:आरोग्यशास्त्र.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ आरोग्यशास्त्र फेफर, किटस्टो व कॅनन ह्यांचे बॅसिलस हें ह्या रोगाचें आदि- कारण बहुधा असलें पाहिजे. कारण रोग्यांचे श्वासनळ्यांतील द्रवामध्यें सापडतें व अन्य रोगांमध्यें नसतें. ह्याची शुद्ध लागवड करतां येते. स्त्रियांपेक्षां पुरुषांत व बालकांपेक्षां वृद्धांत व त्याचेपेक्षां २० ते ६० वर्षांचे इसमांत हा आजार जास्त होतो. गारठा, श्रम इत्यादि थकवा आणणाऱ्या गोष्टी प्रावण्य ( प्रीडिस्पोजिंग ) कारणें होत. मुग्धावस्था २ ते ४ दिवस असते. कचित् १ किंवा ५ दिवसही असते. आजाराची मुदत सुमारें दहा दिवस असते. ह्याचा स्पर्शसंचार रोगोत्तर क्षीणतेंतही बहुधा होतो. हा रोग पुन्हा त्याच इसमाला होतो व आजार चालूं असतांना पुन्हां उलटतो. (१) श्वासाचीं, (२) पचनाचीं, (३) मज्जेचीं इंद्रियें ह्यांपैकीं जीं जास्त व्यापिलीं जातात त्याप्रमाणें ह्या रोगाचे तीन वर्ग करितात. निराळ्या स्थितींत निराळ्या वर्गाचा रोग होतो. सांथीमध्ये प्रत्यक्ष इन्फ्ल्युएंझानें १००० ( हजारांत ) ०.५ पेक्षां अधिक मृत्युसंख्या नसते. परंतु न्युमोनिया, श्वासनलिकांचा दाह, होगा रोगसंकरानें मृत्यूची संख्या हजारी २ होते. ह्या विकारां- तील मृत्यूंपैकीं शेंकडा ५० मृत्यू ६० वर्षांच्या वरील वयाच्या लोकांत होतात. सांथीच्या प्रतिबंधक चिकित्सेसाठी (१) नोटिफिकेशन करावें, (२) रोगी दूर पृथक् जागी ठेवावा, (२) घरें जंतुनाशक द्रव्यांनी धुवावीं व स्वच्छ करावीं.(३)मलमूत्र, थुंकी, कपडे ह्यांचें निर्जंतुकरण करावें. (४) सांथ चालूं असतांना सर्दी,गारठा व कष्ट वर्ज्य करावे. (५) ऊबदार कपडे घालावे (६) मद्याचें सेवन ज्यास्त करूं नये व सार्वजनिक जागेत जाऊं नये. सुमारें दर ५० वर्षांनीं जगद्व्यापी इन्फ्ल्यूएंझाची सांथ जगताला उध्वस्त करून सोडते. तिच्यांत रोगाचे जंतू हवेनें पसरतात यांत बिलकूल संशय नाहीं. ही सांथ हिंदुस्थानांत १९१८ चे ऑगष्टमध्ये