________________
स्पर्शसंचार व स्पर्शसंचारी विकार १७५ 'पद्धत स्वीकारणाऱ्या शहरांत जास्त होतो. (२) रस्ते व खुल्या जागा झाडण्याची व भिजवण्याची व्यवस्था ठेवल्यानें अतिसाराचें मान फार कमी असतें. (३) ज्या शहरांत अतिसारापासून होणाऱ्या मृत्युसंख्येचें मान सर्वांत थोडें असतें. अशीं शहरें घन भूपृष्ठावर वसलेलीं असतात. जमीन उलट स्थितीची असल्यास हें प्रमाण अवश्य जास्त असतें, असें मात्र नाहीं. डोंगराच्या उतारावर वसलेल्या शहरांत मृत्युसंख्येचें मान कमी असतें. ( ४ ) पर्ज्यन्यवृष्टी फार असल्यास अतिसार कमी, व वृष्टी थोडी असल्यास अतिसार अधिक होतो. ह्याच्या उलट उष्णतामानाचा परिणाम घडतो. फार उष्णतामान असल्यास आजार फार व कमी उष्णतामान असल्यास अतिसार कमी होतो. (५) गांवठाणाच्या जमिनीच्या जातींवर अतिसाराचें मान अवलंबून असतें. तरी रस्ते, मैदानें, आंगणें व घरांतील जमिनी तक्तपोशी केल्यानें अतिसाराच्या उद्भवाचा बराच प्रतिकार होतो. ( ६ ) रस्ते व मोऱ्या धुऊन काढल्यानें अतिसार कमी होतो. प्रतिबंधक उपायः - ( १ ) घरांतील व भोवतालची हवा व जमीन दूषित होऊ न देणें. (२) गृहांत स्वच्छता राखण्याच्या संवयींना उत्तेजन देणें, ( ३ ) अन्नांत परकी पदार्थ किंवा जंतू ह्यांचा प्रवेश न होऊं देण्याविषयीं खबरदारी घेणें, (४) विशेषत: उन्हाळ्यांत दूध पाजण्याच्या जरा अगोदर उकळी आणून मग तें वापरावें. दुधाची बाटली वगैरे पुरतेपणीं निर्मळ व स्वच्छ ठेवावी. ( ५ ) भाज्या व फळें काळ- जीनें धुऊन मग वापरावीत. विटलेलें अन्न, कचीं किंवा उतरलेलीं फळें खाऊ नयेत. घरांतील माशाः - घरांतील माशांपैकी ( १ ) मस्का जेमेस्टिका ही जात विशेषतः आढळते. त्याच्या खालोखाल ( २ ) होमा लोमिआ कॅनि- क्युलेरिस (Homa Lomyia Canicularis ) व त्यापेक्षां थोडी ( ३ ) कॅलिफोरा व्होमिटोरिआ ( Calliphora Vomitoria ) ही जात असते.