पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही



१३० आरोग्यशास्त्र असतें. हिंवाळ्यांत तूप स्वच्छ पांढरें घट्ट असून त्यास थोडासा पण बरा वास येतो. बाजारांत नेहमीं निर्भेळ तूप मिळत नाहीं. त्यांत चरबी किंवा भुई- मूग, मोहोडा, खसखस, खोबरें व एरंडी ह्यांचीं तेलें मुख्यतः मिसळतात. हे सर्व पदार्थ पचण्यास जड आहेत. तुपांत चरबी मिसळल्यास तें नेहमीं घट्ट राहतें. त्यांत केळीं, शिजविलेले बटाटे हे पदार्थही घालतात. वनस्पतींच्या तेलांच्या मिसळीची तपासणी: - परीक्षकनलिकेत एक भाग संशयित तूप व चार भाग क्लोरोफॉर्म घालावा व त्यांत फॉस्फो सॉलिडिक अॅसिडाचे थोडे थेंब घालून नळी हालवावी. पुढे ती नळी कांहीं काळ स्थिर ठेविल्यास दोन पदार्थांमध्यें हिरवी कड दिसते. चरबीची परीक्षा करण्याची रीति (१) परीक्षकनलिकेत संशयित तूप व ग्लेशिअल ऍसेटिक अॅसिड समभाग घालून ती नळी ऊन पाण्यांत ठेवावी व हलवावी. तें तूप किती उष्णतामानावर विरघळतें हें पाहून ठेवावें. जर तें २९-३९° सेंटिग्रेड उष्णतामानावर विरघळू लागलें तर तपासणीचें तूप चांगलें असें समजावें. परंतु विरघळण्याचें उष्णतामान ह्याहून जास्त असल्यास त्यांत चरबी आहे असें समजावें. ह्याला व्हॅलेंटेनची परीक्षा असें म्हणतात. (२) दांत एक ह्या प्रमाणांत मंद केलेले कॅर्बालिक अॅसिड एक भाग व तूप अडीच भाग असें परीक्षकनलिकेंत घालून ती नळी हलवावी. पुढें ती नळी कांहीं काळ स्थिर ठेवल्यावर चरबी वर तरंगेल व तूप ॲसिडांत विरघळेल.