________________
अन्न, पेये व मसाले १०१ शरीरांतील व्यापारांमध्यें चरबी व साखर ह्यांचा उपयोग सारखा दिसतो. तरी शरीराचे आरोग्य व सामर्थ्य पूर्णपणें टिकण्यास दोन्हीं जातींच्या पदार्थांचें सेवन केलें पाहिजे. एका ऐवजी दुसरा वापरता येणार नाहीं. खाण्यांतून चरबी बंद करणें मानवत नाहीं त्यामुळे स्वास्थ्य व शक्तीचा क्षय होतो. अन्नांत स्नेही पदार्थ नसल्यास शरीराचे पोषण- व्यापार बिघडतात व विशेषतः मुलांना व तरुण माणसांना क्षयासारखे रोग होण्याचा संभव असतो. कार्बोहैडेट्स बंद करून चरबी इत्यादि स्नेहयुक्त पदार्थ दिले तर फार कालपर्यंत अपाय होत नाहीं. शरीरांतील निरनिराळे द्रव पदार्थ, जसे रक्त, लाळ, जठररस, मूत्र (ह्यांची यथायोग्य घटना) ह्यांचा धर्म कायम ठेवण्यास कार्बोहैड्रेट्स्चा उपयोग होतो. त्यांचेपासून शरीरांत सांपडणारी लॅक्टिक व दुसरी ॲसिडें उत्पन्न होतात. ह्या ॲसिडांची आत्मद्रव्याची क्रिया अल्कलाईन फॉस्फे ट्स् व क्लोरैड्स् इत्यादिकांवर घडून शरीरांत उत्पन्न होणाऱ्या निर- निराळ्या द्रव पदार्थांचें परिपूर्णत्व ( एलॅबोरेशन) होतें. स्टार्च व शर्करा ह्यांची योग्यता व उपयोग सारखा असतो. वरील विवेचनावरून हें सिद्ध होतें कीं, शरीराचे आरोग्यास आल्ब्यु- मिनविशिष्ट ( मांसोत्पादक ) पदार्थ, स्नेहविशिष्ट पदार्थ व कार्बो- हैड्रेट्स ह्या तिन्हीं जातींच्या पदार्थांची आवश्यकता असते. ह्या तिन्हींत आल्ब्युमिनीडायट्स हें अधिक जरूरीचें असतें; कारण त्याचे अभाव नैट्रोजनचा पुरवठा न झाल्यानें जैवी क्रिया बंद पडेल. परंतु, फक्त मांसोत्पादक पदार्थ, पाणी, मीठ यांचे सेवन केल्यास प्रकृति लवकर नादुरुस्त होते. कारण शरीराचे उष्णोत्पत्तीस व शक्तीचे आवि- र्भावास आवश्यक जरूरीची चरबी तिच्या रूपांत नैट्रोजनविशिष्ट पदा- थांचें रूपांतर करण्याकडे शरीराची शक्ति क्षीण होते, व रूपांतर पूर्ण-