________________
७८ होण्यास मदत होते. मनुष्य शुद्धीवर आला म्हणजे थोडे थोडें क पाणी, चहा अगर दारू द्यावी. कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा उपाय फांस लावून घेऊन अगर घुस- मटून मेलेल्या मनुष्यालाही करितात. सर्पदंश. आपल्याकडे सर्पदंशानें शेंकडों माणसें मरतात. सर्पदंश बहुधा हातापायांच्या बोटांना अगर बेचकांत होतो. दंश करि- तांना सर्प दांत रोवून व्रण करितो, व उलटा होऊन विषपिंड दा- बून विषाची धार णांत सोडतो. इतकें होण्यास निदान २/३ सेकंड लागतात, ह्मणून दांत लागल्यावरहि फार त्वरा करून सर्पानें तों- डांत धरिलेला भाग मागें ओढला, अगर सर्पास झिटकारून टाकलें, तर विषाचे थेंब त्वचेखालीं रक्तांत जाण्याऐवजी बाहेर पडतात. नाग कितीहि मोठा असला तरी त्याचा दांत त्वचेखालीं पाव इंच जाऊं शकत नाहीं, व याकरितां तो वस्त्रावरून चावल्यास विष 'बहुधा स्वचेंत शिरत नाहीं. दंश झाल्याबरोबर विष रक्तांत भिनून पसरूं लागतें, म्हणून ताबडतोब तो भाग छाटून टाकला तर उत्तम. देश होताक्षणींच तो भाग गच्च बांधिल्यानेंहि विष जागच्याजागी राहतें. बोटास दंश झाल्यास पहिलें बंधन बोटाच्या मुळाशीं, दुसरें मनगटाजवळ, व तिसरें कोंपराखालीं सहा बोटें अंतरावर बांधावें. रोग्यास वेदना झाल्या तरी निर्दयपणे बंधन घट्ट आंवळावें, व मोळी बांधणारे पीळ भरतात तसा गांठीजवळ