पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे तर पहिलं पाऊल!
हे सारं असं घडलं.
आता कुठे प्रबोधिनीच्या मदतीनं
एकेकीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
अजून बऱ्याच जणींसाठी,
'हे सारं जमू शकेल',
असा आशावाद निर्माण झाला आहे.

ह्या साऱ्यामुळे,
महिलांचे विश्व मोठे झाले,
जगण्याची उर्मी वाढली,
स्वत:वरचा विश्वास दुणावला
हे तर खरच !

आत्ताशी कुठं आजूबाजूला बघायला सुरूवात झाली आहे.
अजून अडचणींवर मात करायला लागणारी,
ताकद आजमावायला,
स्वत:च्या पायावर भक्कम उभाराहायला, वेळ आहे.
त्यांनतरच टिकणारे परिणाम दिसतील.

या साऱ्यातून,
घराघरात बदल होणार,
कुटुंबातील नाती-गोती अन् भावकीही न विस्कटता
हे बदल स्विकारायला,
तुम्ही बी घडाना॥               ६९