पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/७४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाया भक्कम केला. हे काम करताना आत्मविश्वासाअभावीरेंगाळलेली बी. कॉम. ची पदवी मिळविण्याची हिंमतही त्यांना त्यातून मिळाली.
 स्वतःचा स्वाभिमान हरखून बसलेल्या शिवऱ्याच्या सीमाताईंना, गटातूनच तोस्वाभिमान आणि जगण्याची उमेद परत मिळाली. धडपड करणाऱ्या बायजा शेलारनं शारिरिक अधूपणावर मात करुन सरकारी योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचवायचा व प्रत्यक्षात आणण्याचा वसा घेतलाय. सुनीता मुजुमलेलाही ताठ माननं जगण्यासाठीचं पाठबळ गटाच्या कामातुन मिळालय. शिवाय तिच्यातल्या कल्पक आणि धडपड्या उद्योजिकेला वाढण्याची संधी मिळाली.
 तोरण्याच्या कुशीतल्या जाता, वनिता, रेश्मा, शैला यांनी बचत गटातून आरोग्याचा वसा कानाकोपऱ्यातल्या महिलांपर्यंत पोचावायचं अवघड काम हातात. घेतलंय. 'इच्छा आहे पण जमाणार कसं?' अस वाटणाऱ्या आता काम करता करता सारंजमून गेल, आणि काम करताना त्यांची स्वतःची समजही कितीतरी बदलली आहे.
 या सगळ्यांना एकत्र काम करण्याची, घर-शेत यापेक्षा वेगळ्या गोष्टी करण्यातली गंमत कळली, त्याची गोडी लागली, गटाचे काम केल्याशिवाय करमेनासं झालं आणि हिंमत वाढली. बचत गटाचा संसार करण्याचं कर्तेपण गटाच्या कामामुळे त्यांना मिळालं. सगळ्यात मोलाचं म्हणजे संघटिका म्हणून काम करताना, त्यांची नजर विस्तारली. गंगूताईंच्याच शब्दात सांगायचं झालं तर "चुलीपाशी बांधून पडलेली नजर आकाश बघायला शिकली. "म्हणूनच एतक्या सगळ्या जणींमधून या घडल्या - वाढल्या, तिथेच थांबून राहिल्या नाहीत.
 जोपर्यंत आपण कुठून-कशा घडलो याचा त्यांना विसर पडत नाही, आणि प्रामाणिकपणे स्वतः घडता-घडता इतरांनाही घडवण्यांचा वसा त्या चालवताहेत, तोपर्यंत त्यांच्या वाढणअयानं आणि घडण्यानं, कितीतरीजणींना मोलाची साथ मिळणार आहे.
 आता शिकावं आणि करावं तेवढं थोडच हे त्यांना समजलेलं आहे.




६८              आम्ही बी घडलो।