पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंमत आली."
 अशा या शांताबाईंचा गट चालतो तरी कसा?
  "असं बघा गटाला वळण चांगलं हवं. आमच्या गटाचं वळण चांगलं.. म्हणूनच आमचा गट एक नंबरचा. गटामधी नुसत्या पैशाच्याच गोष्टी झाल्या म्हणजे गटाचं वळण बिघडतं. म्हणून आमच्या गटात आम्ही पैशाचे व्यवहार पहिले उरकून घेतो. वस्तीवरच्या लिहिता-वाचता येणाऱ्या एकाला हिशेबासाठी हाताशी घेतो. आमच्या गटात समजूत आन् इस्वास चांगला, त्यामुळं काम पटकन् उरकतं."
 "चार महिला जमल्या की भांड्याला भांडं लागतंच म्हणून समजा. आमच्या गटात आम्ही सगळ्याजणी मोकळेपणानं बोलतो, कुणाच्या घरातल्या अडचणी, कुणाचं औषध-पाणी, कधी एकमेकीतल्या, तर कधी सास्वासुनांच्या कुरबुरी- गटात समजूतीच्या चार गोष्टी कानावर पडतात, जरा शहाणपण येतं, त्यानंच गटाचं वळण चांगलं राहतं. हे सारं ध्यान देऊन करायला लागतं. ते मी बघते सहकारी बँका म्हणून तर मला प्रमुख म्हणत्यात."
 " मला काहीतरी चांगलं करायचंय, पण मला साथ मिळत नाही," असं म्हणणाऱ्या कितीतरी जणींपैकी एक शांताबाई. त्यांच्या अंगच्या (उपजत) गुणांना गटाची साथ मिळाली आणि मग त्यांनी घालून दिला, आदर्श गट कसा. असावा त्याचा धडा.

आम्ही बी घडलो।                 ५०