पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागलं. कारण गटाचा सगळा कारभार तिच्याच हातात. बरं, बोलावं, तरी पंचाईत, कारण गटाची बैठक तिच्याच घरात भरायची. आपसात बोलून महिलांनी यावर उपाय शोधला. त्यांनी गटाची जागाच बदलून टाकली आणि मग प्रत्येकीला दडपणाशिवाय आपलं मत मांडायची संधी मिळायला लागली, म्हणजे लोकशाही रूजायला लागली. अशी लोकशाही रूजण्याची हिंमत येते, तेव्हा हा गटाला वळण लागत असतं.
जबाबदारी पाहावी घेऊन
 आंबवणं गावात गट सुरू झाले. खालच्या आळीच्या शालनताई . तळेकर गटासाठी गावात जायच्या. सुरूवातीला त्यांना काहीच माहित है। नव्हतं. गटाचे व्यवहार काय, आणि कसे चालतात, आपलं मत वेगळं असलं, तरी ते मांडायला त्यांना दबाव वाटायचा. पण गटाचे व्यवहार बघता-बघता, त्या शिकल्या, व्यवहार कळायलाही लागले आणि हिंमतही वाढली. आणि मग जबाबदारी पाहावी घेऊन, असं म्हणत त्यांनी इथल्या महिलांना जमवलं आणि नवीन गट सुरू केला. आता तर खालच्या आळीला सुरू झालेले चारही गट नीट चालतात ना हे स्वतः । त्या जबाबदारीने बघतात. गटातल्या महिलांसोबत बँकेतही जातात. त्यांच्या अडचणी दूर करतात.
 गटातली जबाबदारी, दुसऱ्या कोणाला तरी बघावीशी वाटणं, ती दुसऱ्या गटांपर्यंत पोहोचवणं हेही गटाला वळण लागायचंच लक्षण.
गोष्टी बोलू शहाणपणाच्या चार
 सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेलं रहाटवडे गाव. त्या गावात चालणारा शांताबाईंचा आदर्श गट.
 लहाणपणीच त्या लग्न होऊन गावात आल्या. शिक्षण तिसरी. पण पहिल्यापासून सामाजिक कामाची खूप आवड. आपला संसार करता
४८                 आम्ही बी घडलो।