पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५०,००० रुपये खर्च केले. तरी पन......काय करायचं. गटापुढं प्रश्न पडला. "तिची बचत १००० रुपये ती वळती करून घेऊ." त्यावर पमा म्हणाली "गट बंद करायचा तर तिच्या वाट्याला येणारं ५०० रुपये व्याज पण वळतं करू." तरी १००० रुपये बाकी होते. रखमाबाई म्हणाली, "जाऊ द्या हो. गटाकडून मदत केली असं समजू . ती पण नडलीच होती ना. तिनं काही त्या पैशावर मजा मारली नाही. अडीनडीला आपण बायांनी तिला आधार नाही द्यायचा तर कुनी द्यायचा? सगळ्यांना मिळून का त्या पैशाचं ओझं होतंय?" निकाल लागला. सान्यांनी होकार दिला. गट संपला. प्रत्येकीला तिची असणारी बचत १००० रुपये मिळाली आणि त्यावरं ३ वर्षात जमलेलं ४५० रु. व्याज मिळालं. पुन्हा नव्यानं गट बसला आणि सान्यांनी ठरवलं, की महिन्याला बचत २५ रु. ऐवजी आता ५० रु. भरायचे. उत्साह टिकून होता. बायडाबाईच्यामुळे ५० रुपये कमी मिळाले या दु:खापेक्षा कुणाला तरी आपण उपयोगी पडलो, सगळं व्यवस्थिशीर झालं हे सुख त्यापेक्षा मोठं होतं. त्यातून उभारी मिळाली.
लोकशाहीसाठी ..
 “गटात कुनी लहान नाही, कुनी मोठं नाही' असं सुरूवातीला ठरलं होतं. तरीही ते प्रत्यक्षात यायला वेळ जावा लागतो. गटात घेतले जाणारे निर्णय जेव्हा प्रत्येकीला आपले वाटायला लागतात, तेव्हाच गट सगळ्यांचा हे प्रत्यक्षात येतं. भरतवाडीत हे कसं झालं याची गोष्ट मोठी मजेदार आहे.
 भरतवाडीतला एक गट नेहमी एकाच सदस्य महिलेच्या घरात भरायचा. ती महिला शिकलेली असल्यामुळं गटप्रमुख. पण त्यामुळं गटात तिचाच शब्द चालायला लागला. कुणाला उचल द्यायची, किती द्यायची हे तिच्या सल्ल्याशिवाय ठरेनासं झालं. एकेकीला तिचं वागणं खटकायला
तुम्ही बी घडाना ।।                 ४७