पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "गटाचा फायदा जसा आपला, तसा तोटा बी आपला"- एकीन. मत मांडलं.
 "१५ रु. प्रत्येकीनं भरले, तर तोटा भरून येईल. " ताईंनी सुचवलं. १५ रु. भरायचे म्हणजे सगळ्यांनाच जड वाटत होतं. गट आपला, तेव्हा गटाची जबाबदारीही आपली, हेही पटत होतं. विचार करून सर्वांनी तोडगा काढला की १५ रुपये घरून आणून भरायला सगळ्यांनाच अवघड होतं म्हणून ही रक्कम गटातून खर्च झाली अस समजू, साऱ्यांनाच हा तोडगा पटला.
 प्रत्येकीला १५ रुपये घालवावे लागले खरे, पण त्यातून गटाची बयां वाईटाची जबाबदारी सभासद म्हणून आपलीच, कारण गट माझा आहे ही जाणीव प्रत्येकीला झाली आणि त्यातून गट जास्त शहाणा झाला, गटाची समज वाढली. ही गोष्ट १५ रुपये पेक्षा नक्कीच जास्त मोलाची होती. गटाची ही घटनासर्वगावोगावच्या गटांमध्ये घडली तशी सांगितली, तेव्हा त्यांनीही त्यातून योग्य तो धडा घेतला, आणि त्यातून तेही गट जास्त शहाणे झाले.
 गट म्हणजे आपणच, हे सगळ्याजणींच्या मनात रुजायला लागलं- ही खरी लाखमोलाची गोष्ट.
आंबवण्याची गोष्ट
 जानुबाई बचत गटाची ३ वर्ष पूर्ण झाली. गट चांगला चालत होता. सुरूवातीला ३ वर्षांनी सारे पैसे वाटप करून पुन्हा सुरू करायचे असं गटात ठरवलं होतं. ३ वर्ष झाली. म्हणून हिशोब सुरू झाला. सर्वांनी पैसे जमा केले. पण बायडाबाईचे पैसे काही जमले नाहीत आणि ती पण हजर नव्हती. आता काय? थोडे थोडके नाही तिनं २,५०० रुपये अर्थसाहाय्या घेतलं होतं. पण मागायचं कसं? तिनं तर नवऱ्याच्या इलाजासाठी घेतली होतं. खूप खर्च केला होता. पण तिनं गडी गमावला होता.तिनंइलाजासाठी
४६                  आम्ही बी घडलो।