पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

फायदा आहे. करून बघितल्या शिवाय फायदा होतो का तोटा ते कसं कळणार? माझ्यासारखंच आमच्या बालवाडीच्या सुनिताबाईंना पण वाटायला लागलं. तेंव्हा आम्ही दोघी-तिघींनी ठरवलं, 'तोटा झाला तरी चालेल,पण एवढी जोखीम उचलायचीच,' असं म्हणून बाकीच्यांना पण तयार केलं आणि एकदाचा आमचा गट सुरू झाला.
 सुरूवातीला आमच्या गटाला अजिबात वळण नव्हतं. सारखी भांडणं, वादावादी व्हायची. पण हळूहळू सवय लागली. गटाचं हिशोब कसे करायचे, बायकांची पुस्तकं कशी भरायची, उचल घ्यायची रक्कम समजुतीनं कशी वाटायची हे कळायला लागलं. त्यामुळं स्वत:बददलचा विश्वास पण वाढला. इतका की गटाच्या साथीनं छोटे-छोटे उद्योग सुरू करण्याची हिंमत आली.
 सुखदाताई कधी बटाट्याचे पापड करून ते विकायला पाठवतात, कधी शेतावरच्या मजूर बायकांनी रानातून गोळा केलेला मध विकायला ठेवतात, परड्यात शतावरी लावून त्याच्या मुळ्या विकतात. असे घरबसल्या करता येतील असे उद्योग त्यांनी सुरू केले.
 महिलांना घर संभाळून कितीतरी गोष्टी करायला येतात, त्यातून आपल्या हातात पैसा कसा खेळेल याचा विचार सुखदाताईंनी केला. बरोबर उद्योग करण्याची किल्ली तर हीच आहे, पण एवढ्यावरच सुखदाताई थांबल्या नाहीत. त्यांच्यापर्यंत पोचलेला गट त्यांनी अजून दूरवर पोचवला. त्यांचं काम बघून आता आंबवणं गाव ग्रामीण शासनाच्या पतपुरवठा कार्यक्रम योजनेत (एम्. आर. सी. पी.) त्यांना घेतलं गेलंय. त्यांनी गावातल्या काम करणाऱ्यांची मोट बांधली आणि गावाचा विकास करायचं साऱ्यांनी मिळत ठरवलंय.
 "एरवी धनगर महिला आमच्या देशपांड्यांच्या घरात यायच्या त्या कामासाठी, शेतमजुरीसाठीच. जसा मला गटाचा फायदा व्हायला


तुम्ही बी घडाना ॥                 ४१