पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवहार कसा करायचा ते चोख सांगते." संजाबाई पुन्हा बोलली. तिला द्वारकीच भारी कौतुक.
 "आपल्यासारख्या बायांना हक्काचा आधार होतो गटामुळं! दारूड्या नवऱ्यांच्या बायकांना चोरून पैशे साठवायची सोय होती. मला जसा गटाचा आधार झाला तसा समद्यांनाच व्हायला पायजे, म्हणून मी गट सुरू करायला येळ काढला."
 "आका तुमी बोलता तसं दिव्यानं दिवा पेटवावा, तशा आपण बी द्वारकाबायच्या संगतीन शाण्या होऊ.” संजाबाई म्हणाली.

उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी

 उषा आणि पद्मा गायकवाड यांची धडाडी वेगळीच. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेल्या वेल्हे गावात, माळावरच्या वस्तीवर रहाणाऱ्या दोघी. परिस्थिती गावकुसाबाहेरच्या सगळ्याच वस्तीची असते, तशी.
 नवीन काही शिकायला मिळावं म्हणून दोघीजणी गटात यायला लागल्या. पण निव्वळ पैसे बाजूला टाकायचे, याहीपेक्षा काही ना काही वेगळा उद्योग केला पाहिजे हे दोघींच्याही डोक्यात पक्क होतं. त्यांचा उत्साह बघून ताईंनी त्यांना उद्योगासाठी गट करायला सुचवलं.. माळावरच्या दारिद्रयरेषेखालच्या महिलांनी गट केला तर त्यांना उद्योगासाठी आर्थिक मदत देण्याची सरकारी योजनाही सांगितली. पुढाकार घेऊन दोघींनी गट सुरू केला. त्यांनी खडू तयार करण्याचा उद्योग करायचं ठरवलं. मन घट्ट करून सरकारी कचेऱ्यांमध्ये जाऊन, सगळी माहिती करून घेतली. खडू तयार करायला शिकणं आणि तेवढी रक्कम हाताळायला शिकणं सगळंच नवीन होतं.तेही त्यांनी केलं. पुण्याहून उद्योगासाठी नेमक्या अंदाजाप्रमाणे सामान खरेदी करणं, गटाबरोबर खडू तयार करणं, तयार मालासाठी बाजारपेठ शोधणं, प्रत्येकच काम

-----

२८                 आम्ही बी घडलो।