पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "धंदा चालवनं , सगळ्यांचं काम नाय. आपल्याला तर नाय जमायचं त्ये." मंजुळा बोलली.
 "तुझीतरी कमालच . आता या द्वारकीपाशी काय डबोलं हुतं का काय धंदा सुरू करायला? फकस्त ५०रुपये घरबसल्या धंदा सुरू केला तिन! धंदा कशाचा करायचा ह्ये तिनं बराबर वळखलं,अन् त्येवढी जोखीम पत्करली. लक्ष्मी कधी उगाच येत नसती, आपण तिला आणाया लागतं."
 द्वारकाताई म्हणाली, “गटातल्या इतर बायांच्या आणि ताईंच्या बोलण्यानं गटाचा हिशेब कळायला लागला. त्यानं मी किती सुधरली हाय त्ये तुमी बघताच की.”
 “मी काय म्हनते, हिंमत आन् चिकाटी असली म्हंजी सगळंच हुतंय असं नाय. गडीमान्सांची अडवणूक किती असती बायांना." मंजुळा पुन्हा म्हणाली.
  "अगं सांते , बाई मानूस पुढं गेलं की पुरुषाला स्वतःचा अपमान झाल्यागत वाटतयं, ह्ये तर माझ्याबी वाट्याला आलंय . पर त्यातून बी आपुन हिंमत धरली तर काम हुतंय, आन् आपण कमाई केली की त्येवढा बोलायचा हक्क बी मिळतोय आपल्याला. आता माझ्या हाटेलाचंच बग , मालक माझ्या जोडीनं राबतायत.”
 "द्वारकाबायने खत इकायचा धंदा बी केला, त्यासाठी ही द्वारकी सोताच्या जिवावर कंत्राटदाराशी बोलून खताच्या गोणींची गाडी घेऊन तिच्या गावाला आली, आन् नवऱ्याला सांगितलं, की पोती उतरून घे. गावातल्या इतर बायांनी ऐकलं, की बाईमाणूस, स्वतःच्या मालकाला असं सांगतीय . त्यांना दिसलं, की गटात आल्यामुळं त्यांच्याच सारख्या बाईला केवढी हिंमत आली, घरच्यांची तिच्याकडं बघण्याची नजरच बदलली आहे. तवा त्यांनी मनानंच गट सुरू केला. ही द्वारकीच त्यांना गटाचं काम समजून देती. तिला स्वत:ला नाही येत लिहा वाचाया तरी

-----
तुम्ही बी घडाना ॥             २७