पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 म्हणजे शकुंतलाबाईंना बळ मिळालं पैशाचं.
 "हा निसतं पैशाचं नका म्हणू, अवं गटात जायला लागले म्हणून । जशी उचल हक्कानं घ्यायला लागले, तशी जामीन बी राहायला लागलेच । की. एरवी माझ्या शब्दाला कुणी विचारलं तरी असतं का?"
 म्हणजे पैशाच्या जोडीनं शकुंतलाबाईंना विश्वास मिळाला की, माझ्या शब्दाला किंमत असेल, असं हक्काचं ठिकाण आहे.
 “इस्वास तर कितीक गोष्टींचा मिळाला. आता हेच बघा. गटात यायच्या आदुगर पैशाचा व्यवहार बघायची येळच आली नव्हती. पण गटातून । दर खेपेला उचल घेत गेले, तशी हजाराच्या रकमा बी हाताळायला यायला लागल्या.मी.कमीत-कमी १०-१५ हजाराची रक्कमतरी हाताळली असंल.
 "पैशाचा आधार मिळतो. तसा बचत करायचा उल्हास बी वाढतो. आणखी बचत करावी असं वाटायला लागतं." आता तर मी २००रुपय । हप्त्याच्या भांडवल गटाला पण जाते.
 "मी गटाची बैठक होता-होईतो चुकवली नाही. आपलं पुस्तक भरायला, गटात काय होतं ते समजून घ्यायला प्रत्येकानं गटाला हजर हायलाच पाहिजे. असं गटाच्या बैठकीला जाऊन तर मला चारजणीत मिसळायची सवय लागली. आधी घराभाइर पडत नव्हते, ती चार-चौघींकडं। यायला जायला लागले. त्यानं पण मला चांगलं बोलायला यायला लागलं, बोलायची भीड चेपली. अन् माझी गटांची पुस्तकं पाहून मला वाचाया थोडं। थोडं यायला लागलं, लहानपणी तर मी शाळेत २-४ दिवसच गेलेली, पर आता माझ्या पुस्तकात काय लिहिलंय ते मला माझं वाचायला येतं.
 "आता गटाचा येवढा इस्वास आलाय, त्याचा अजून चार जणींना बी फायदा व्हावा . म्हणून मी कुंभारवाड्यातल्या बायांशी बोलले. ताईंना सांगितलं का आमच्या लोकांना बी शहाणपण यायला पाहिजे. अन् कुंभारवाड्यातल्या बाया बी गटाच्या बैठकीला चार जणीत यायला लागल्या. त्यातली येक जण तर खाटीक. म्हंजी गटात आल्या म्हणून

२२            आम्ही बी घडलो।