पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सेवाशुल्काचा दर जरा जास्तच आहे असं त्यांना वाटायला लागलं ! आणि त्यानंतर त्यांच्याही गटात सेवाशुल्काचा दर कमी करायची बोलणी त्यांनी सुरू केली, अर्थातच सेवाशुल्काचा दर सगळ्यांना परवडेल असा महिन्याला २% ठरला!
 स्वत:पुरतेच पाहाणान्या सगळ्यांनाच या उदाहरणानं धडा मिळाला. गटातला प्रत्येक निर्णय हा कुणा एकीचा नव्हे तर सगळ्यांच्याच फायद्याचा हवा! आणि एकदा नियम केला की झालं असं नाही तर सगळ्यांच्या विचारानंतोबदलताही येतो. अशाच छोट्या मोठ्या प्रसंगातून गटाची समजूत वाढत असते. त्यासाठी गटानं स्वत:लाच शिस्त लावून घ्यावी लागते.
वेळेची किंमत
  ससेवाडीच्या एका गटात ठरलं की बैठक दर महिन्याच्या ८ तारखेला बरोबर रात्री ९ वा. सुरू करायची. घरातलं सगळं आटपून यायला सगळ्या बायकांना ही वेळ सोयीची होती. पण बघावं तर एकाही बैठकीला २० च्या २० जणी काही वेळेवर येईनात, त्यामुळे वेळेवर येणाऱ्यांचा खोळंबा व्हायचा आणि उशीरा येणाऱ्यांना गटात काय चाललंय ते कळायचं नाही . म्हणून आपसात बोलून त्यांनी यावर तोडगा काढला की बैठकीला १० मिनिटांपेक्षा उशीरा येणारीनं १ रुपये दंड भरायचा. असा नियम केला तेव्हा मात्र वेळ लक्षात ठेवायची किंमत १ रुपये ठरली. तशी सगळ्यांनाच बैठकीची वेळ पक्की लक्षात राहायला लागली, आणि | गट बरोबर ९ वा. सुरू व्हायला लागला!
गुंतवणुकीसाठी सेवाशुल्क दर कमी हवा
 गावात गट सुरू झाला तेव्हा गटात अर्थसाहाय्य किती टक्क्यानं द्यायचं हे ठरत होतं. गटानं एकमुखानं ठरवलं ४% दरमहा, कारण गावात

तुम्ही बी घडाना ॥        १५