पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एक म्हणाली 'सावकारासारखाच दर म्हणजे ५० रुपये ठरवूया.
 'म्हणजे?' ताईंनी विचारले,
 '५०० रुपये उचललं तर फेड पुरी होईस्तोवर दर महिन्याला ५० रुपये भरायचं" ताईंनी हिशोब केला आणि विचारलं म्हणजे दर १०० रुपयाला १० रुपये महिन्याला म्हणजेच १० टक्के दरमहा? हा दर । सावकारा एवढाच झाला. गटात येऊन सेवाशुल्काचा बोजा व्हायला लागला तर कसं व्हायचं?'
 'ह्ये बी खरंच. मंग सावकार नाय तर फंड आन् गटात फरक काय ।
हायला?'.
 'म्हंजे आपला दर कमी पायजे. बोज़ा होनार नाही असा.' आणि । बोलण्या-बोलण्यातून शेवटी सगळ्यांनी सेवाशुल्काचा दर ठरविला । महिन्याला ३%- म्हणजेच, दर १०० रुपये मागे दर महा ३ रुपये! आणि । ठरवलं की जशी जशी मुद्दल फिटेल तसं ते बी कमी कमी व्हायला पायजे. सेवाशुल्काचा दर ठरला, कसं आकारायचं ते सुद्धा ठरलं.
 तर, गटातले लहान-मोठे निर्णय आपणच घ्यायचे असतात.
सेवाशुल्काचा दर बदलला
 रांझे गावात एकूण ५ गट सुरू झाले. गावातल्या इतर सगळ्या गटांमध्ये सेवाशुल्काचा दर होता दर महा २% किंवा ३%, म्हणजेच १०० रुपये मागे २ किंवा ३ रुपये पण एका गटात मात्र सेवाशुल्काचा दर ४% होता. गटातल्या काही मंडळींना हा दर जास्त वाटतच नव्हता. कारण त्यांना वाटायचं की पैसे उचलायची गरज आपल्याला कशाला पडतीय, तेव्हा बाकीच्यांना जरी दर जास्त वाटला तरी विचार कशाला करायचा? आणि गटातल्या बाकीच्या सदस्या त्यांच्या दडपणामुळे बोलल्या नाहीत. त्या आपली कशाबशा फेड करायच्या. थोड्याच दिवसांनी त्या मंडळींवर अर्थसाहाय्य घ्यायची वेळ आली, तेव्हा मात्र

१४          आम्ही बी घडलो।