पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

      - गटात आलं म्हणजे गटाचा आधार
      वाटतो.
      - पैशाचा.व्यवहार कळायला लागतो.
      - चार चौघात कसं वागायचं ते समजतं.

  • नियम

 असा चालतो या बचतगटांचा कारभार. हा कोणाच्या तरी मर्जीवर
चालणारा बेशिस्त कारभार नाही. महिलांनीच स्वतःच घालून घेतलेल्या. नियमांनी या कारभाराला शिस्त आली आहे.
  काय आहेत हे नियम?
  - दर महिन्याच्या गटांच्या बैठकीला सर्व जणींनी नियमित यायचं.
  - ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळेला हजर राहायचं.
  - बचत आणि परतफेडीचा हप्ता वेळेवर भरायचा.
  - गटाच्या कारभारात प्रत्येकीनं लक्ष द्यायचं.
  - आणि जर हे जमलं नाही तर दंड भरायचा.




तुम्ही बी घडाना ॥        ११