पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याशिवाय गटातल्या २० जणींच्या नावावरचा महिन्याचा व्यवहार जमाखर्च पत्रकात लिहिलेला असतो. त्याची कार्बन प्रत काढली जाते.. एक प्रत गटात राहाते व एक प्रत प्रबोधिनी मध्ये जमा केली जाते.
  याशिवाय गटातल्या प्रत्येकीचा व्यवहार सभासद खाते वहीमध्ये असतो. याचा हिशोब संघटिका बघतात.
 ५ वर्षाच्या गटाच्या व्यवहारासाठी लागणारे हे अर्थसाहाय्य अर्ज, सभासद पुस्तके, खातेवही हे सगळं ठेवण्यासाठी मापाची पिशवीही असते. संस्थेतून हे साहित्य गटास मिळते. त्यासाठी गटाने रुपये ५००/- सभासदत्व शुल्क जमा करायचे असते.

  • गट नोंदींसाठी काही इतर खर्च येतो का?

 गटाच्या अडचणी सोडवण्याचं आणि गटाचे हिशोब तपासण्याचं जोखमीचं काम संस्था करते. त्यासाठी संस्थेला येणारा खर्च प्रत्येक गट दरमहा काही वर्गणी काढून भरून देतो. याला प्रबोधिनीत संघनिधी म्हणतात. कोणतीही गोष्ट फुकट घ्यायची किंवा आपल्या गरजेसाठी आपण काहीच किंमत द्यायची नाही, असं न करता, बचत गट, त्यांच्यासाठी केलेल्या कामाची ही रक्कम समजून उमजून जमा करतात.

  • बँकेत-पोस्टात सुद्धा बचत करता येते मग गटामध्ये असं काय

वेगळेपण आहे?
  तर महिलाच सांगतात हे वेगळेपण,
महिलांच्या बचत गटामध्ये
- कागदपत्रांची कटकट नाही. ..
- बाईमाणसाला समजेल असा कारभार:
. . - गावकी नि भावकीतल्या बायांसोबत
विश्वासाने होणारा व्यवहार
- अडीनडीला हक्काचा मिळणारा पैसा
.. मिळतो.

१०         आम्ही बी घडलो।