पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रुपये अशी ५ महिन्यात मुद्दलाची फेड करायची. त्याशिवाय गटाने आर्थिक सेवा शुल्काचा (व्याजाचा) दरही ठरवायचा. दरमहा २% किंवा ३% असा म्हणजे, ५०० रुपये अर्थसाहाय्य घेतले तर पुढील महिन्यात २% दरानेरुपये १०सेवाशुल्क जमा करायचं. जसंगट ठरवेल तसं. सेवाशुल्क दर (व्याजदर) आपल्याला बोजा होणार नाही, असा हवा.
* ही व्यवहाराची रक्कम कोणाकडे व कधी द्यायची?
 त्यासाठी गटांतल्या सगळ्यांनी मिळून सर्वांना सोयीचा महिन्याचा ठराविक दिवस व ठराविक वेळ ठरवायची. कुठे जमायचं ते ठिकाणही ठरवायचं आणि सगळ्याजणी जमल्यावर सगळ्यांसमोरच ते व्यवहार करायचे. काळजीने सर्वांनी वेळ पाळायची. कोणी कोणाकडे आधी पैसे द्यायचे नाहीत की मागाहून देवाण घेवाण करायची नाही. सर्व व्यवहार सर्वांसमोरच झाले पाहिजेत.
* मोठी रक्कम अर्थसाहाय्य म्हणून हवी असेल तर कशी मिळायची?
 बचत गटांचा कारभार चोख असेल आणि आर्थिक सेवाशुल्काचा (व्याजाचा) दर कमी असेल तर बँकांकडून गटाच्या नावावर मोठ्या रकमेची कर्जे मिळू शकतात. आपल्या या काही गटांनीसुद्धा बँकेकडून उद्योगासाठी कर्ज घेतलेलं आहे. आणि आता तर गट सुरू झाले की, गाच्या नावानं बँकेमध्ये खातंच उघडतात, म्हणजे दर महिन्याला जमणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम गटाच्या नावाने बँकेत जमा करता येते व बँकेतून कर्ज प्रकरण करता येते.
* गटामधल्या व्यवहाराची नोंद कशी होते?
 खरे तर गटाचे व्यवहार विश्वासाच्या आधारावरच चालतात, तरीही कुठलाही घोटाळा होऊ नये म्हणून गटातल्या व्यवहाराच्या नोंदी असतात. प्रत्येक सभासदाकडे तिने गटात केलेला व्यवहार नोंदवलेले सभासद पुस्तक असते. हे पुस्तक बैठकीच्या वेळीच भरले जाते.



तुम्ही बी घडाना ॥