पान:आमची संस्कृती.pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८६ / आमची संस्कृती

चेहे-याची ठेवण हिंदू रक्ताच्या मिश्रणाने निवळली.'(!) असे वाक्य लिहिले आहे.
 डॉ. केतकरांच्या लेखनातील दुसरा दोष प्राचीन भारताविषयी त्यांना वाटत असलेल्या आत्यंतिक जिव्हाळ्यामुळे उत्पन्न झाला आहे. त्यांचे लेख वाचीत असता जगात भारतीयांपूर्वी दुसरा एखादा सुसंस्कृत समाज होऊन गेला असेल असे वाटतच नाही. भारतीय संस्कृतीचे गोडवे गाताना भारतीय संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा मिसर व असीरिया ह्या देशांतील आर्यपूर्व सेमाईट संस्कृतीचे केतकरांना सर्वस्वी विस्मरण होतेसे दिसते. आर्य संस्कृतीविषयी केतकरांचा अभिनिवेश पाहिला म्हणजे त्यांच्या थोडे अगोदर परलोकवासी झालेल्या सर ईलियट स्मिथ ह्या समाजशास्त्रज्ञाची आठवण होते. केतकरांना जो अभिमान भारतीयांविषयी वाटे, अगदी तसाच अभिमान स्मिथ यांस मिसरदेशीय संस्कृतीविषयी वाटे. मिसरदेशीय संस्कृती जगात सर्वांत जुनी असून सर्व प्राचीन समाजांत जी संस्कृती दृष्टोत्पत्तीस येते तिच्या निर्मितीला चालना मिसरी संस्कृतीने दिली, आणि तिची घटनादेखील मिसरा समाजघटनेवरूनच ठरविली गेली, असा त्यांचा ठाम सिद्धांत होता. मिसरी संस्कृती भूमध्यसमुद्राभोवतालचे प्रदेश आक्रमूनच राहिली नाही, तर इराण, हिंदुस्थान यवद्वीप, पॅसिफिक महासागरातील अनेक बेटे ह्या मार्गाने प्रवास करीत अमेरिकेतील पेरू व मेक्सिको या देशापय पोचली, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न स्मिथ यांनी व त्यांच्या अनुयायान केला आहे. निरनिराळ्या समाजातील संस्कृती ही त्या त्या समाजाने इतरांपासून अलिप्त राहून अगदी एकट्याने घडवून आणिलेली अ" कधीच नसते, तर ती मुख्यत्वेकरून इतर समाजाकडून घेतल उसनवारीवर उभारलेली असते, आणि सर्व जगाला सांस्कृतिक भाडव इजिप्तने पुरविले, अशा दुहेरी स्वरूपाचा त्यांचा सिद्धांत आहे. पैकी पहिल्या भागाच्या बुडाशी असलेले “मानवी संस्कती है। मानवसमाजाच्या दळणवळणाचे प्रतीक होय, हे तत्व आता समाजशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक होऊ पहात आहे आणि मिसरी संस्कृती प्राचीनतम असल्यामुळे ह्या सिद्धांताच्या दुस-या भागातही सत्यांश आहे. डॉ. केतकरांच्याप्रमाणे स्मिथसाहेबांचे