पान:आमची संस्कृती.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२ / आमची संस्कृती

झिजतात. रस्त्यावर गाड्या जाऊन जाऊन रस्त्यांवर चाकोच्या पण पडतात; दगडावर व रस्त्यावर हे जे संस्कार घडतात ते त्यांच्या स्वत:च्या संस्कारित जीवनामुळे नव्हे. हे संस्कार मानवी जीवनाचे साक्षी आहेत. नांगरलेली शेते, पूल, बांधलेले प्रवाह, धरणाने अडवलेले जलाशय, हे पृथ्वीवर घडलेले संस्कार मामवांच्या संस्कारित जीवनाची प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. जड वस्तूला स्वत:चे संस्कारमय जीवन नाही, पण प्राण्यांना तसे असते का?
 पक्षी थंडीवाऱ्यापासून पिलांचे संरक्षण करण्यास घरटी बांधतात पिलांना चारा भरवतात, त्यांना संगोपितात. त्यांना उडणे, शोधणं भक्ष्य वगैरे महत्त्वाचे शिक्षण थोड्याबहुत प्रमाणात देतात. कित्येक पक्षी दरवर्षी त्याच त्याच ठिकाणी येऊन घरटी बांधतात. काहींमध्ये नर-मादीचे जोडपे जन्माच्या गाठीने बांधलेले असते. घरटी मोठी सुबक असतात. पक्षी संघ करून राहतात. त्यांच्या समाजजीवनात उच्च-नीच भाव असतो, म्होरक्या व अनुयायी असतात. स्वत:च्या मालकीच्या जमिनीची जाणीव असते. निरनिराळ्या पशुजातींमध्येही हे गुण आढळतात.
 पक्षी व चतुष्पाद ह्यांच्यापेक्षा खालच्या पायरीवरचे म्हणून समजल्या जाणाऱ्या कीटकांमध्ये कित्येक कीटक-जातीचे समाजजीवन इतके विस्तारलेले व गुंतागुंतीचे असते की, त्याचे वर्णन करावयाचे झाल्यास मानवी समाजजीवनाच्या अनुषंगाने करावे लागते. ह्या कीटकाचा मोठमोठी शहरे असतात, राण्या असतात; त्यांच्यात काम करणार कामकरी असतात, लढणारे शिपाई असतात. आपण गुरे पाळून दूध काढतो त्याप्रमाणे काही कीटक दुसऱ्या क्षुद्र कीटकांचा सांभाळ त्यांच्या शरीरातून स्रवणाया मधुर रसाचा उपयोग करतात. एका करून राज्यातील कीटक दुसऱ्यांवर चढाई करून भीषण रणकंदन करतात.
 असल्या जीवनात माती, काटक्या वगैरे सृष्टीतील पदार्थाचा उपयोग करून. स्वत:च्या जीवनासाठी त्यांचे रूपांतर केलेले आढळते. व्यक्ती व्यक्तींची व गटागटांची वागणूक ठरलेल्या बांधीव मार्गाने होते. मग असले जीवन संस्कारमय नाही का?
 पण प्रस्तुत स्थळी ज्याला संस्कृती म्हटली आहे व ज्यांना संस्कार म्हटले आहेत, ते हे नव्हेत.