पान:आमची संस्कृती.pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / ७५

बाबतीत कठीण होत गेला आहेसोपे विषय घेऊन जेमतेम पासाचे मार्क मिळवणाच्या मुलाला कॉलेजचे पहिले वर्षच फार जड जाते, विषय कळतच नाही व मग प्रत्येक इयत्तेत दोन दोन-तीन तीन वर्षे काढून आयुष्याची मोलाची वर्षे फुकट घांलवून बरेचसे पैसे खर्जुन न्यूनगंड व विफलता पदरी घेऊन ही मुले कॉलेजातून परत फिरतात. कॉलेजचा शिक्षणक्रम सोपा करावा म्हणावे तर सर्वच शाखांमधून ज्ञान इतके फोफावलेले आहे की, हल्लीचा शिक्षणक्रमसुद्धा रसायन, पदार्थविज्ञान,जीवशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास वगैरे विषय समजण्याच्या दृष्टीने कोता पडतो, अशा वेळी साध्य काय व साधन काय ह्याचा नीट विचार झाला पाहिजे. माझा समाज सुशिक्षित करून सधन व संपन्न करणे हे माझे ध्येय आहे तर त्यातील तरुणांना खूप अभ्यास करावयास सांगणे, कष्टाशिवाय बिद्या व अर्थ मिळणे दुरापास्त आहे हे त्यांच्या मनात पटवणे, गरिबांसाठी भांडून भांडून सरकारकडून शिक्षणासाठी भरपूर पैसा काढणे ह्या गोष्टी न करता, भराभर शिक्षणाचे मानच कमी करून टाकणे म्हणजेथोडक्यात लोकानुरंजन करण्याचाच मार्ग नव्हे का? शिक्षणाचे मान कमी करण्याने आज काहींचा फायदा झाल्यासारखा दिसला तरी शेवटी सर्व समाजाचाच तोटा होणार नाही का? सगळेच बी.ए. आणि सगळेच मॅट्रिक असले तरी आकडेमोडीच्या खात्यात शेवटी तामीळ लोकच जास्त दिसतातते तो विषय त्यांना माहीत, त्यांच्या आकडेमोडीवर विसंबण्यास हरकत नाही ह्या भरवंशामुळेच ना! आमची शेतकन्यांची मुले नागर जमातीच्या मुलांइतकीच हुशार आहेत. त्यांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. ही समस्या सोडविण्याचा मार्ग आजचे पुढारी अनुसरतात तो खासच नव्हे.

 आगरकरांची आठवण आज का होते?
 त्याचप्रमाणे जातिभेदाच्या प्रश्नाबद्दल बलावयाचे ते फक्त कायद्याच्या भाषेतच आजकाल होते. ह्याउलट आज समाजहिताच्या दृष्टीने सर्व लोकांनी एकत्र जमून ह्यावर विचार होणे जरूर आहे असे कोणास वाटत नाही. समाजसुधारणेच्या सदरातून जाऊन आज हा प्रश्न एक राजकीय व पक्षीय प्रश्न होऊन बसला आहे. भावना जुन्या, हेवेदावे