पान:आमची संस्कृती.pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / ६


 उभा राहतो. ह्या पुढा-यांना नि:संदिग्धपणे जाब विचारणे जरूर नाही का? की पक्षभक्तीपुढे सत्यासही हार खावी लागते? ह्या बाबतीत श्री. काकासाहेब गाडगीळांनी काढलेले पत्रक आगरकरांच्या विचारसरणीस धरून आहे व काँग्रेसभक्तांनीही चौकशीची मागणी उचलून धरणे सत्यास व न्यायास धरून होईल. जोपर्यंत असत्य व अन्याय यांविरुद्ध आगरकरांच्या हिरीरीने आपण तुटून पडत नाही तोपर्यंत समाजकल्याण व सर्वोदय कदापि होणे शक्य नाही.

 जनतेचा रोष व उपहास जुमानला नाही.
 आगरकरांच्या पुढेमागे काही वर्षे जन्मलेले लोक त्या वेळी आपापल्या परीने महाराष्ट्राला राजकीयष्ट्या, सामाजिकदृष्ट्या व धार्मिकष्ट्या जागे करण्याचे प्रयत्न करीत होते. अशाच त-हेचे सर्वांगीण आंदोलन बंगालमध्ये पण होत होते. बंगालमध्ये धार्मिक सुधारणेची चळवळ जास्त यशस्वी होऊन ब्रह्मो समाजाची स्थापना झाली; पंजाबमध्येही दयानंदांनी आर्य समाजाची स्थापना केली. बंगालमधील बहुतेक सुधारक ह्या नव्या पंथाचे झाले. महाराष्ट्रात मात्र सुधारक म्हणून ज्यांची नावे प्रामुख्याने पुढे येतात असे लोकहितवादी, आगरकर, कर्वे वगैरे मंडळी नवधर्मसंस्थापनेपासून सर्वस्वी अलिप्त राहिली. त्याचा परिणाम असा झाला की, हे लोक- म्हणजे लोकहितवादी व आगरकर, लिहिताना, ‘आम्ही हिंदू लोक' असे प्रथम पुरुषी लिहित, व जळजळीत झोंबणारी टीका स्वत:च्याच समाजावर करीत. अशा त-हेचे व इतके अव्याहत लिखाण समाजसुधारणेबाबत दुस-या कोणत्याही प्रांतात झालेले नाही. केसरीमधील राजकीय लेख व सुधारकामधील सामाजिक लेख समाजाची झोप, आळस व उदासीनता नाहीशी करीत होते, बिचा-या महाराष्ट्रीय हिंदू समाजाला क्षणाची उसंत मिळू देत नव्हते. सबंध पणे सुधारकाने आज कशावर बरे शस्त्र उपसले, म्हणून उत्सुक होते. समाजाची सदसदविवेकबुद्धी जागी करण्यासाठी त्यांची धडपड व त्यांचा दीर्घोद्योग हे, त्यांचे स्वदेशप्रेम व आशावादी वृत्ती ह्यांचे द्योतक आहे.
 'यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाचरणीयं नाकरणीय।' हे वचन त्यांच्या लेखांतून दोन-तीनदा आले आहे ते त्याज्य म्हणूनच. एकदा मनाला