पान:आमची संस्कृती.pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२ / आमची संस्कृती

चुरा हे उत्तम खत आहे. त्यांची चरबीही उपयुक्त असून तिचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. ह्या राष्ट्रीय संपत्तीचा सर्व त-हेने भरपूर उपयोग कसा करता येईल, ह्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण जनतेला हवे. धर्माच्या नावाखाली भावना चेतवून द्वेषबुद्धी निर्माण करण्याने राष्ट्राचे कधीही हित होणार नाही.
 गोवधाने हिंदूंच्या भावना दुखावतात; डुकरे मारणे किंवा खाणे मुसलमानांना निषिद्ध आहे, तर अल्पतम प्राणी म्हणजे ढेकूण, उवा, पिसवा वगैरेंसुद्धा मारणे जैन धर्माच्या विरुद्ध आहे. सर्वांनी एका राज्यात राहावयाचे म्हटले तर प्रत्येकाला शक्य तर आपले आचारधर्म पाळण्याची मुभा देता येईल, पण इतरांवर बंधन कसे घालता येईल? ज्या हिंदूंना गाई पूज्य वाटतात त्यांनी रोज त्यांना नमस्कार करावा, व आपली पापे नष्ट करावीत; त्यांचे दूधतूप खावे; पण इतरांनी त्यांच्याच समजुतीप्रमाणे वागावे असा आग्रह योग्य नाही.
 सदगुणांचे दुष्परिणाम
 परंतु उलटपक्षी जेथे जेथे हिंदू राज्य प्रबळ होऊन त्यांच्या सत्तेखाली पराभूत आणि हतबल अशी लक्षलक्ष मुसलमान प्रजा आलेली होती, तेथे तेथे त्या मुसलमानांवर, हिंदूवर पूर्वी झालेल्या अत्याचाराचा सूड उगविण्यासाठी- मुसलमान हिंदूची करीत, त्याप्रमाणे त्यांची सरसकट शाका, शिरच्छेद, करून टाकण्याची तर गोष्ट दूरच पण ते परधर्मीय म्हणूनच त्या मुसलमान प्रजेला काडीइतकाही धार्मिक उपद्रव हिंदूंकडून होत नसे. उलट त्यांना सामुदायिक नमाज, ताबुतासारखे सार्वजनिक उत्सव हिंद अधिका-यांच्या संरक्षणाखाली करता येत. नव्या नव्या मशिदी नि धर्मस्थाने उभारून आपल्या धर्माचा व्याप नि वैभव सुखाने वाढविता येई; हिंद नागरिकांप्रमाणेच नव्हे तर अधिक सौम्यपणे नि सवलतीने मुसलमान नागरिकांना त्या त्या काळच्या हिंदूंच्या राज्यात नैर्बाधिक अधिकार भोगता येत त्या वस्तुस्थितीलाही इतिहासाच्या पानापानाचा आधार आहे.
 आणि ह्याच वस्तुस्थितीकडे मोठ्या अभिमानाने बोट दाखवुन ‘पाहा आमचा हिंदू धर्म किती परधर्मसहिष्णु आहे, सहिष्णुता हाच आमच्या हिंद धर्माचा भूषणास्पद नि विशिष्ट सदगुण आहे; म्हणून त्या त्या काळचे