पान:आमची संस्कृती.pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६० / आमची संस्कृती

काशीच्या देवाचे नाव विश्वेश्वर आहे. सबंध विश्व राहोच, पण हिंदूतल्या सगळ्या जातींनासुद्धा तो देव जवळ करीत नाही. तो पतितपावन तर नव्हेच नव्हे. तो दुसऱ्यांना पावत करीत नाही, तर स्वत:च दलितांच्या स्पर्शाने पतित होतो! हरिजनांनी मंदिरप्रवेश केला म्हणून विश्वेश्वराचे नवे देऊळ बांधणान्यांचा कडकडून निषेध शिवरात्रीची पर्वणी साधून का बरे केला गेला नाही! स्वधर्मीयांच्या आचारविचारांची दखल का बरे घेतली गेली नाही! इतरांनी अमके खावे का नाही, अमके जनावर मारावे की नाही ह्याची विवंचना करण्याचे कारण काय? हा खटाटोप धर्माच्या उन्नतीसाठी नसून एक राजकीय पवित्रा मात्र आहे. मोकाट सुटलेली ही मोठी जनावरे दुकानदारांच्या मालात तोंड घालतात व रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्याला ढुशा देतात. रस्त्याने जाणाच्या गुरांचा पादचाऱ्यांना, विशेषत: शाळकरा मुलांना फार त्रास होतो. कधी कधी जिवावर बेतते. त्या गुरांच्या मागून भर रस्त्यावर थांबून शेण गोळा करणाच्या बायका पाहून मानभावांचा शेनपुंजी दृष्टांत सात शतकांनंतरही खरा आहे ह्याची प्रचिती पटली, तरी येणाऱ्या जाणाच्या वाहनाखाली ह्या बाया सापडणार की काय अशी सारखी भिती वाटते. गुरांवर योग्य नियंत्रण व मोकाट जनावरे जप्त करण्याची ताबडतोब व्यवस्था झाली पाहिजे. पण वर म्हटल्याप्रमाणे धर्माच्या नावाखाली माणसांपेक्षा जनावरांनाच जास्त किंमत दिली जात आहे.
 धर्मसंरक्षणाच्या खुळचट कल्पना
 ज्या गाई-बैलांबद्दल एवढी सहानुभूती त्यांना वागणूक काय मिळते? त्यांचे कष्ट घेऊन त्यांना अत्यंत निकृष्टावस्थेत जेमतेम जिवत ठेवण्यापलीकडे हिंदू काहीही करीत नाहीत. त्यांना पराणीने टोचणे; जनावर काम देईनासे झाले की, त्याला इतके कमी खाणे द्यायचे की, त भुकेने तडफडून मरते. अशापेक्षा त्याला मारणे काय वाईट? आंध्रात मोठमोठे गाडे असतात. आंध्रात बैलही फार उमदे व मोठा असतात. त्यांना गाड्याला जोडले तर बैलांचे ढुंगण व गाड्याची पुढची कड ह्यात निदान फुटाचे तरी अंतर असते व बैल मोकळेपणे चालू शकतो. महाराष्ट्रात मात्र बैल इतक्या दाटीवाटीने बांधालेला असतो की गाड्याची पुढची बाजू शेपटीला व ढुंगणाला घासून रक्त गळत असलेले लेखिकेने अनेकदा