पान:आमची संस्कृती.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ५३

 या लेखामधले शेवटचे दोन अनुच्छेद ('सद्गुणांचे दुष्परिणाम' आणि 'ती अधर्मसहिष्णुता होती') स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या लेखनामधून उधृत केले आहेत.
संदर्भ - समग्र सावरकर वाड.मय, खंड ३ मधील
 सहसोनेरी पाने, पृष्ठे १६४-६५, छेदक ४६२-४६६
प्रकाशक - शां. शि. सावरकर, १९९३.

५. गोवधबंदीची चळवळ




 स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणाच्या काही मंडळींनी आजकाल गोवधबंदीच्या चळवळीची धमाल उडवून दिली आहे. गोवधबंदीची चळवळ काही आजचीच नाही, पुष्कळ दिवसांची आहे. कधी कधी ती मंदावते, तर कधी जोरात येते. गेले काही दिवस ह्या चळवळीला जोर चढला आहे व तिचा हिंदू मंदिरातून व हिंदूंच्या व्रतोपवासांचे दिवस साधून फार जोराचा प्रचार चालला आहे.
 ह्या चळवळीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी एक उत्कृष्ट लेख पूर्वी लिहिलेला आहे. त्यांच्या लेखानंतर मी लिहिण्याची गरज नाही. हा त्यांचा लेख लोकांच्या डोळ्यांपुढे सध्या नाही म्हणून पुन्हा एकदा ह्या चळवळीबद्दल लिहिणे भाग पडत आहे. तरीसुद्धा सावरकरांचा लेख सर्व मराठी मासिकांनी व वर्तमानपत्रांनी पुन्हा एकदा छापावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे.

 हिंदू धर्म आहे तरी काय?
 हिंदू धर्म आहे तरी काय,त्याची थोडक्यात राहोच, पण विस्ताराने तरी व्याख्या करणे शक्य आहे का, ह्याबद्दलही माझ्यापेक्षा हजारो पटींनी ज्येष्ठ व श्रेष्ठ लोकांनी विचार केलेला आहे. खुद्द लोकमान्यांनी ह्या