पान:आमची संस्कृती.pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५२ / आमची संस्कृती

ओरिसा

१. भुंइया- बिहार, ओरिसा, मध्यप्रदेश.
२. मुंडा- (स्मत लाख)- उत्तर ओरिसा, सुंदरगड.
३. गोंड- (बत्तीस लाख) उत्तर ओरिसा, कोएल नदीच्या उगमाचा प्रदेश.
४. जुआंग- उत्तर ओरिसा।
५. खोंड- (साडेतीन लाख)- दक्षिण व मध्य ओरिसा- कोरापुट, कंधमाळ, फुलबानी, उत्तर आंध्र, मध्यप्रदेश.
६. कोया (दीड लाख)- उत्तर प्रदेश (गोदाकाठ), दक्षिण ओरिसा.
७. सवरा (साडेतीन लाख)- उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण व मध्य ओरिसा, मध्यप्रदेश, दक्षिण बिहार.
८. पोरजा- दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र.
९. बोंडो- दक्षिण ओरिसा.
 आदिवासी किंवा वन्य ही काही एक अखंड सलग जमात नव्हे. त्यांच्यात शंभर दोनशेवर पृथक पृथक जमाती आहेत. सर्व जरी वन्य असल्या तरी त्यांची भाषा, पोशाख, चालिरीती ह्या सर्वांत खूप फरक आहे.
 आदिवासी ज्या भाषा बोलतात त्या मुख्यत्वेकरून चार मोठ्या भाषाकुलांत आढळतात. ती भाषाकुले व त्यांतील आदिवासी बोलतात त्या भाषा खालीलप्रमाणे आहेत.
 इंडो-युरोपीय भाषाकुल:-भिल्ल (भिल्ली), कातकरी, ठाकूर, वारली.
 द्राविड भाषाकुल:- तोडा, बेट्टा, कुरबा, जेनु कुरुबा, सोलेगायेरवा, मृदुवन, मालपंटारम, चेंचू, कादर, गोंड (गोंडी), कोलाम (कोलामी), कोया (कुई), खोंड (खोंडी), उराव व कोरकू (कुरुख), पहाडिया, माल पहाडिया (कुरुख) कोंडा रेड्डी, कोंडा दोरा, कम्मरा.
 ऑस्ट्रो एशिआटिक व मॉन ख्मेर भाषाकुल:-बोंडो, जुआंग, मुंबा, गदग, सवरा, संथाळ, हो, खासी, सिटेंग.  टिबेटो-बर्मन भाषाकुल:-मिकिर, मिश्मि व सर्व नागा जमाती.

- १९५७