पान:आमची संस्कृती.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४८ / आमची संस्कृती

मेळाव्यासाठी किंवा वन्यांच्या नाचाचा फड दिल्लीला स्वातंत्र्यदिना'च्या दिवशी नेण्यासाठी हजारोंनी रुपये खर्च करते!
 वन्यांच्या नावाने जो कोट्यवधी रुपये खर्च होतो, त्यापैकी वन्यांच्या प्रत्यक्ष वाट्याला किती जातो, अधिकाऱ्यांचा फिरतीवर, ऑफिसवर व कल्याण केंद्रातील अधिकाऱ्यांवर किती खर्च होतो, याची पाहणी झाली तर बरे होईल.

 केंद्राने हे पैसे प्रांतांच्या स्वाधीन करून अमक्या प्रदेशात अमके करा असे सांगितले तर कदाचित जास्त लाभ होईल.


 नव्या भिंती उभारू नका
 वन्य हे त्या त्या भाषिक प्रांताचे अविभाज्य घटक आहेत हे धोरण ठेवून त्यांच्या कल्याणाची योजना आखली व वन्य' 'वन्येतर' हा फरक तात्पुरता आहे, तो लवकरच नष्ट होईल असे धोरण ठेवले, तर वन्यांचे, भाषिक प्रांतांचे व भारताचेही अंती हित होईल. ह्या धोरणानुसार वन्यांसाठी शैक्षणिक योजना आखाव्यात. वन्य व वन्येतरांना एकत्र आणण्याचे प्रयत्न शाळांतून व्हावेत. एखादा भिल्ल प्राथमिक शिक्षक असेल तर शहरांतून काम करण्याची त्याला संधी द्यावी. त्यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना आखावयाच्या त्यांत त्यांच्या शेजारी राहणाच्या निर्धन मागासलेल्या लोकांचाही समावेश करावा. वन्यांना दिल्लीला नाचावयास पाठवण्याऐवजी ते व त्यांच्या विभागांतले लोक टोळ्याटोळ्यांनी प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रातून पाठवावेत. खोंड, कोया, मंडा, वगैरे यांना पुरीच्या जगन्नाथाचे दर्शन घडवले; तेथील ओबडधोबड भयानक मूर्तीच्या पायावर त्यांनी डोके ठेवले व तेथील मिष्टान्नाचा प्रसाद त्यांनी आपल्या इतर बांधवांबरोबर खाल्ला म्हणजे वन्येतरांचे देव आपल्या देवांसारखेच आहेत व आपण सर्व एक आहोत ही भावना त्यांच्यात लावेल. भिल्ल, ठाकूरांना पंढरीच्या वारीला पाठवले तर काळा विठोबा आपलाच हे त्यांना ताबडतोब पटेल.

 एवढेच नव्हे तर काही दशकांत विद्वान पंडित वन्य, सप्रमाण असेही दाखवू शकतील की, हिंदूची ही पूज्यतम दैवते मूळ वन्यांचीच होती!

 वन्यांना भारतसंचारासाठी पाठवायचेच असेल तर एका भाषिक