पान:आमची संस्कृती.pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४० / आमची संस्कृती

आंध्र, आसाम, बिहार, मुंबई, मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान व पश्चिम बंगाल या प्रदेशांतून ती १५ ते ३९ लाख आहे. प्रांताप्रांतातून संख्या वेगवेगळाली आहे एवढेच नव्हे, तर इतर लोकसंख्येशीही त्याचे प्रमाण भिन्न भिन्न आहे.
केरळात आदिवासींचे प्रमाण शेकडा १ टक्का, आंध्रात ३ टक्के, मुंबई प्रांतात ८ टक्के, बिहारात १० टक्के, आसामात व मध्यप्रदेशात प्रत्येकी १९ टक्के व ओरिसात २१ टक्के असे आहे.

भाषांची परस्पर-दुर्बोधता

वन्येतर भारतात जी प्रमुख भाषाकुले सापडतात ती वन्यांच्या बोलींमध्येही सापडतात, हे या लेखाच्या शेवटी दिलेल्या निरनिराळ्या प्रांतातील मुख्य वन्य जमाती व त्यांची वसतिस्थाने यासंबंधीच्या माहितीवरून दिसून येईल. ज्याप्रमाणे एका भाषा-कुलातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या वन्येतर भारतीयांना एकमेकांचे बोलणे कळणे अवघड जाते तसेच वन्यांच्या बाबतीतही होते. भिली भाषा कातकऱ्यांना किंवा वारल्यांना कळत नाही, त्याचप्रमाणे सोलेगा, चेंचू, मालपंटारम व कादर ह्यांच्या भाषा परस्परांना अनाकलनीय आहेत. तोच प्रकार उरांव, गड, कोलाम व खोंड लोकांत व मुंडा, संथाळ, बोंडो व खासत आहे. हिंदी, उडिया, मराठी, बंगाली ह्या भाषा जशा निरनिराळ्या, तशाच एकाच कुलांतील वन्य भाषाही निरनिराळ्या आहेत. लिखित वाड्याची परंपरा अजिबात नसल्यामुळे व निरनिराळे समाज दूरदूर राहत असल्यामुळे भाषांची परस्पर-दुर्बोधता वाढलेली आहे.

आचारविचारांतही विविधता

ही विविधता भाषेतच आहे असे नव्हे तर इतर आचारविचारातही भरपूर प्रमाणात आढळते. काही वन्य जमार्तीत पितृप्रधान कुटुंबसंस्था आहे; तर काहींत मातृप्रधान कुटुंबसंस्था आहेत. काही बहुपत्नीक, तर काही काही जमाती बहुपतिक आहेत. काहींमध्ये उच्चनीच कुळी आहेत तर काहींत समानता आहे. काही जमातींत तर अस्पृश्यतासुद्धा आढळते. उदा. गोंड व परधान, परधान हे गडांचे आश्रित व अस्पृश्य गणले जातात.