३० / आमची संस्कृती
डोंगरांच्या रांगांनी विभागलेला व जुनी संस्कृती स्मृतिशेष राहिलेल्या देशांपैकी होता, व ह्या पुढारलेल्या केंद्रांतूनही मुसलमानी धर्म पूर्णतया स्वीकारला गेला. चीनमध्ये फार काळ मुसलमानी राजांचा अंमल बसला नाही. थोडेबहुत लोक महंमदाचे अनुयायी झाले, पण मोठ्या जोराने धर्माचा प्रसार झाला नाही. ह्याउलट हिंदुस्थानात मुसलमानांची राज्ये व उपराज्ये १४ व्या- १५ व्या शतकापर्यंत चांगलीच दृढमूल झाली. धर्मांतरही फार प्रमाणात झाले; इतके की आज सर्व जगातील मुसलमानांची लोकसंख्या घेतली तर हिंदुस्थानातील मुसलमानांची सर्वांत अधिक भरते. असे असूनही देश मुसलमानांचा झाला नाही; व मुसलमानही बहुसंख्य लोकांपासून अलिप्त राहिले. ज्या लोकांनी धर्मांतर केले त्यांतील राजधानीजवळचे लोक सोडले तर इतरांनी आपली पूर्वीची भाषा, पोशाख, वगैरे जसेच्या तसेच ठेवले. पूर्व बंगालमधील मुसलमान हिंदूपेक्षा निराळे पडत नाहीत. केरळात तर मुसलमानांनी पूर्वीची मातृसत्ताक कुटुंबपद्धती हिंदूंपेक्षाही जास्त आस्थेने टिकविली आहे. इतकी सांस्कृतिक एकरूपता होत होती की, हिंदूंची जातिसंस्था हिंदी मुसलमानांत सर्वत्र कायम राहिली; राठोड मुसलमान पिढ्यानपिढ्या मुसलमान झाल्यावरही आपण राठोडवंशीय रजपूत होतो हे विसरत नाही. तो हिंदू महाराच्या हातचे पाणी पीत नाही. जरी मुसलमानी लोकसंख्येच्या दृष्टीने हिंदी मुसलमान बहुसंख्य असले तरी पूर्व-पश्चिम सीमेखेरीज इतर सर्वत्र त्यांची संख्या खुद्द हिंदुस्थानात थोडीच राहिली. इतकी सांस्कृतिक एकरूपता असूनही केवळ एकदैवतवादामुळे मुसलमान परकेच राहिले. धर्मयुद्धाच्या वेडाला ते कधी बळी पडतील याचा नेम नसे. जेथे-जेथे त्यांचे राज्य होते तेथे-तेथे इतर धर्मीयांविरुद्ध कायदे असल्यामुळे इतरांची धर्मभावना जागृत राहण्यास मदत झाली. देवळे फोडून वा भ्रष्ट करून मशिदी बनविण्याच्या प्रयत्नामुळे बहुजनसमाजाची त्यांच्याविषयीची परकीयत्वाची भावना जिवंत राहिली, व शेवटी औरंगजेबासारख्या कडव्या मुसलमानामुळे हिंदूंच्या धर्माभिमानाची ज्योत प्रखर होऊन यांतच मोगली सत्ता खाक झाली. मुसलमानी धर्मप्रसारकांमुळे पुष्कळ हिंद मुसलमान झाले; राज्यशासनविषयक वाङमयात उर्दू व फारशी शब्दांचा भरणा झाला; मोगली पोशाखाला काही प्रसंगी सामान्य