पान:आमची संस्कृती.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२८ / आमची संस्कृती

अलिप्तता आली. 'स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' यामुळेही ही अलिप्तता वाढली. जातिसंस्था दृढमूल झाल्या.
वरील गोष्टींचा योग्य बोध होण्यासाठी हिंदुस्थानात कुटुंबसंस्थेचा विकास कसा झाला; कुल, जाती, ग्रामसंस्था कशा वाढल्या; त्यांच्यात प्रादेशिक भिन्नत्व काय आहे याचा शोध करून त्यांचे नकाशे काढून टिपण केल्यास भारताच्या इतिहासावर पुष्कळच प्रकाश पडेल. -

१९४९