पान:आमची संस्कृती.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / २७


राहील असा तो सर्वसत्ताधीशही नाही. हिंडूची आपल्या देवाशी वागणूक कधी आदरयुक्त, कधी प्रेममय, कधी व्याजोक्तीपूर्ण तर कधी अरेरावीचीही असते!

 हे विशेष पवित्र व हे सामान्य, हे सूक्त व हे असूक्त, हे विहित आणि हे निषिद्ध असे ठरविणारा काही स्वतंत्र, स्वयंसिद्ध मानदंड नसल्यामुळे सर्व प्रकारचे आचार निरनिराळ्या जमातीत किंवा एकाच व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातही एकमेकांच्या आड न येता सुखाने नांदू शकतात, आईबाप व मुले यांच्यात एक हजार वर्षांचाही सांस्कृतिक फरक असू शकतो!

 अशा रीतीने नेहमी जुळते घेण्याच्या प्रवृत्तीत गेली पाच हजार वर्षे हिंदी संस्कृती वाढली आहे आणि या दीर्घ कालखंडात वाढूय, धार्मिक समजुती, तत्त्वज्ञान, नीतिकल्पना या आणि अशा इतर हजारो विषयांच्या बाबतीत असे काही सांस्कृतिक ऐक्य साधले गेले आहे की, त्यामुळे हिंदू हा इतर सर्व हिंदूसारखा आणि हिंदूतरांपेक्षा वेगळा असा चटकन उमगून येतो. ख्रिस्ती धर्माने युरोपवर लादलेल्या ऐक्यापेक्षा हिंदुस्थानातील हळूहळू उत्क्रांत होत आलेले हे सांस्कृतिक ऐक्यं कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे

 परंतु या समावेशक व सर्वसंग्राहक वृत्तीच्याच पोटी आपापले भिन्नत्व कायम टिकविण्याची वृत्ती उत्पन्न होते. तुझे तुझ्यापाशी व माझे माझ्यापाशी, या वृत्तीमुळे एक प्रकारची अलिप्तता उत्पन्न झाली- कुंपणे पडली. केंद्रीय प्रबळ सत्तेच्या अभावी आणि मानवी गरजांपैकी प्रमुख जी सुरक्षिततेची गरज तिच्यामुळे कुटुंब हेच केंद्र बनले. निरनिराळे धंदे करणारी कुटुंबे आपापली वैशिष्ट्ये कायम ठेवून स्वत:भोवती तट उभारून बसली. जातिसंस्था हिंदुस्थानात कोणी आणली हे आज निश्चित सांगता येत नाही. पण तिचा उगम या अलिप्ततेच आहे. आपापल्या धंद्यांचे वैशिट्य टिकविण्याच्या प्रयत्नामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे स्पष्ट भेद पडले. पहिल्या दोघांची एक प्रकारची एकी असे. पैसा उत्पन्न करण्याच्या कामी तिसऱ्याचीही गरज भासे आणि पूर्वीच्या प्रजेचा अंतर्भाव चवथ्यात होई.

 केंद्रीय संरक्षणव्यवस्थेच्या अभावी एक प्रकारचा विस्कळितपणा आला. व्यवहारात परस्परांबाबत अविश्वास, मत्सर, असहिष्णुता . वा