पान:आमची संस्कृती.pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२२ / आमची संस्कृती


आसेतुहिमाचल अशी ब्रिटिश राज्याप्रमाणे प्रस्थापित होऊ शकली नाही व टिकूही शकली नाही.

 धार्मिक बाबतीत केंद्रीय सत्ता तर हिंदुस्थानात कधीच नव्हती. एखाद्या विशिष्ट धर्मतत्त्वाचा आग्रह धरून त्याचा प्रसार व अंमल कडवेपणाने सर्व देशभर करील अशी प्रबळ केंद्रीय धर्मसत्ता व धर्माधिकारी नव्हते. ख्रिस्ती चर्चची जशी एक सुसंघटित केंद्रीय सत्ता होती व ती जशी राजसत्तेच्या बरोबरीने राज्याधिकाच्याप्रमाणेच धर्माधिकाच्याकरवी लोकांवर अंमल चालवी, किंबहुना राज्यसत्तेला अंकित करून धर्मसत्तेचे प्राबल्य दिसून येई, तसे हिंदुस्थानात झालेले आढळून येत नाही. ईश्वर एकच आहे आणि ख्रिस्त किंवा महंमद हा त्याचा एकमेव प्रेषित आहे; त्याला मानणारे, भजणारेच तेवढे काय ते स्वर्गाचे अधिकारी, इतर पाखंडी लोकांस तो अधिकार नाही; महंमदास प्रेषित न मानणारे ते सारे काफीर; त्यांना जरूर तर तलवारीच्या बळावरही आपल्यासारखे बनवावे, नव्हे तसे त्यांना बनविणे हे एक श्रेष्ठ धार्मिक कर्तव्य आहे; ख्रिस्ताला न मानतील ती सारी बापुडी वाट चुकलेली कोकरे आहेत; त्यांना हाताला धरून ख्रिस्ती पंथाच्या वाटेला लावणे हे परम पवित्र कर्तव्य होय; अशा तऱ्हेचा आग्रह व तदनुसार धर्मप्रसाराची जोरदार फळी उभी केलेली हिंदुस्थानात दिसून येत नाही. अनेक राज्यसत्तांप्रमाणेच अनेक धर्मपंथही येथे एकमेकांशेजारी सुखाने नांदू शकत. देव एकच म्हटला तर एकही आहे. आणि त्याची रूपे भिन्नभिन्न मानली तरी हरकत नाही. प्रत्येक देवाचे पुजारी निराळे. प्रत्येक जातीला किंबहुना प्रत्येक कुटुंबाला दुसऱ्या दैवताला कोणत्याही प्रकारे कमीपणा न आणता स्वत:साठी खास असे कोणतेही दैवत पसंत करता येत असे. सांस्कृतिक संक्रमणाचे स्वरूप यांमुळे एकजिनसी किंवा केंद्रीकृत झालेले नव्हते. लोकांनी परंपरागत ज्ञान विशिष्ट जिल्हाधिकाऱ्यांकडून विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने घेतले पाहिजे अशी सक्ती नव्हती. काही लोक ते पुस्तकांद्वारा मिळवीत. तर बहुसंख्य लोक ते धंदेवाईक, कथेकरी, नट, गायक, भाट, चारण यांच्याकडून प्राप्त करून घेत. ब्राह्मण लोक देशभर संचार करून लोकांस धर्मतत्त्वे शिकवीत. पण या सर्व धर्मप्रसारकांस एका दावणीत बांधणारी प्रबल केंद्रीय धर्मसत्ता किंवा च्या दैनंदिन जीवनावर परिणाम करील अशी प्रबळ केंद्रीय राज्यसत्ता