पान:आमची संस्कृती.pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८ / आमची संस्कृती

२. हिंदूंच्या सांस्कृतिक इतिहासाचे मर्म


 परदेशी प्रवासी, इतिहासकार किंवा राज्यकर्ते यांनी हिंदुस्थानातील समाजव्यवस्थेबद्दल पुष्कळ लिहून ठेविले आहे. परंतु हिंदुस्थानात आढळून येणाऱ्या असंख्य जाती, पंथ, देव व वंश यांमुळे ते गोंधळून गेलेले दिसतात. हिंदूच्या समाजसंस्था या त्यांना एखाद्या अडगळीच्या खोलीत वाटेल तसे अस्ताव्यस्त टाकलेल्या सामानासारख्या वाटतात. या संस्था इतक्या बहुसंख्य आणि बहुविध आहेत की, त्यांचे वर्णन करता करता या मंडळींच्या लिखाणात एक प्रकारचा निराशेचा सूर उमटू लागतो. हिंदी संस्कृतीच्या इतिहासाचा महान प्रवाह ज्या अनेक लहान-लहान प्रवाहांनी बनलेला आहेत्यांचा सूक्ष्म अभ्यास केल्याशिवाय त्या मोठ्या प्रवाहाच्या यथार्थ स्वरूपाचे आकलन होणार नाही.
 या अनेकविध समाजसंस्थांच्या नुसत्या वर्णनाने समाजाची रचना कसकशी होत जाते याचे आकलन होणार नाही. त्यासाठी हिंदी संस्कृतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी काळजीपूर्वक अभ्यासली पाहिजे, म्हणजे हिंदुस्थानातील समाजात दिसून येणाच्या विविध आणि कधीकधी परस्परविरोधी चालीरीतींचाही बोध होईल. एका खंडप्राय विस्तीर्ण देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेल्या आणि प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंतच्या गेल्या सुमारे पाच हजार वर्षात