पान:आमची संस्कृती.pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १७३

 याची चौकशी केले होती का?
 भेटायला येणा-यांत गरीब-श्रीमंत सर्व असतात. गरिबांचे बाप पुष्कळदा हताश होऊन ढसाढसा रडतात. तुमच्या मुलाचे भवितव्य केवळ एका परीक्षेवर ठरविलेले नाही. पाहा; तो तिमाहीत नापास आहे, सहामाहीत नापास आहे व आता चाचणी परीक्षेत नापास आहे. तुम्हांला मुलगा नापास झाला म्हणून कार्ड पाठविले होते. मुलगा वेळच्या वेळी कॉलेजात जातो का, लेक्चर ऐकतो का, अभ्यास करतो का, ह्याची कधी चौकशी केली होतीत का?' सर्वांचे उत्तर नकारार्थी असते. अशांची समजूत काढणार कशी? काहीही सांगा, उत्तर एकच- ‘आता तो अभ्यास करील. त्याचे वर्ष बुडवू नका.' वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलांना सांगण्यात येते, ‘बाबांनो, रोजी रुपया ह्याप्रमाणे तुम्ही शिक्षणाची फी देता. हा शिक्षकवर्ग, हे वाचनालय, ह्या प्रयोगशाळा ह्यांचा भरपूर उपयोग करा. अशी संधी तुमच्या हजारो देशबांधवांना मिळालेली नाही. तुम्हांला परत मिळणार नाही. खेळ खेळा, वादविवाद सभा गाजवा, नाटक-सिनेमे पाहा, कॅफेत गप्पा छाटा, पण सर्व अभ्यास झाल्यावर.' मुलांना वाटतं ही चर्पटपंजरी संपणार कधी?
 टर्म भरायचे नियम, निबंध लिहावयाचे नियम, आठवड्यांतून काही दिवस व्यायाम करण्याचे नियम असे निरनिराळे नियम पहिल्या वर्षापासून अगदी एम.ए.पर्यंत असतात. ते न पाळणारे थोडथोडेच विद्यार्थी असते तर इतके वाईट वाटण्याचे कारण नाही. पण त्यांतले बरेचसे नियम मोडूनही टर्म मिळावी अशी ब-याच विद्यार्थ्यांची इच्छा असते. कोणी सहामाहीत नापास (शेकडा पाच-सहा मार्क मिळवून) तरी होतात, किंवा कोराच पेपर देतात, कोणी निबंध पुरेसे लिहीत नाहीत. अशांची संख्या अगदी वरच्या परीक्षांना काय असते ह्याची ठोकळ कल्पना पुढील कोष्टकावरून येईल.