पान:आमची संस्कृती.pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६६ / आमची संस्कृती

ज्यांना शेकडा २५ वर तरी मार्क मिळाले आहेत असे काहून, शेवटी १७ असे राहिले की, त्यांनी मुळीच अभ्यास केला नसल्यामुळे त्यांना फॉर्म मिळाला नाही. मुलगा तिमाही-सहामाहीत नापास झाला असे कळवूनही ज्यांनी दखल घेतली नाही असे बरेच पालक मुख्याध्यापकास भेटावयास येऊन ‘उरलेल्या दोन महिन्यांत मुलगा अभ्यास करीलफॉर्म द्या' म्हणून विनंती करून गेले. पुरेसा पैसा नसल्यामुळे लोकाश्रयावर चालणाच्या संस्थांच्या चालकांना हे दिवस किती मनस्तापाचे गेले असतील त्याची कल्पना इतरांना येणे कठीण!
 इंटर सायन्सचा रिझल्ट, पाठवलेल्या मुलांच्या शेकडा ६५ टक्क्यांच्या जरा वर फग्युसनमध्ये साधारणपणे लागतो तसाच यंदाही लागेल, असे धरून चालले तर असे दिसून येईल की, ४५०-१७८४३३ पैकी २८६ विद्यार्थी पास होतीलत्यांतील २५८ सर्वच्या सर्व (आजारी पडले नसल्यास) व इतर २८ ते ३० असणार. आणखी दहाची भर घातली तरी मूळच्या ४५० तले १५४ खाली राहणार. ह्याची जबाबदारी शिक्षक, पालक, विद्यार्थी व परीक्षापद्धती ह्या चारांवर आहे असे धरून चालले, तर शिक्षक अभ्यासक्रम संपवतो का, मुलांच्या वह्या तपासतो का व प्रयोग नीट होतात का- ह्या प्रश्नांचे उत्तर वर दिलेल्या पद्धतीत थोडेबहुत मिळते. विद्यार्थ्यांकडून योग्य प्रमाणात अभ्यास करून घेण्याची काळजी घेतात असे म्हणण्यास हरकत नाही. शेकडळ ३३ टक्के ह्या सर्व पद्धतीचा फायदा घेतात. उरलेले तितकासा घेत नाहीत व शेकडा १० टक्के मुळीच घेत नाहीत. फॉर्म दिला नाही तर पालक विनंती करावयास येतात. विद्यार्थी दहादा खेपा घालतात. वर्ष फुकट गेले म्हणून त्यांना वाईट वाटते. पण आपल्या कर्तव्यात कसूर झाली असे विद्यार्थी व पालक दोघांनाही वाटत नाही. ‘आम्ही फी देतो, नापास झालो तर आमचे पैसे जातील, तुमचे काय बेचते?' अशी त्यांची विचारसरणी असते. ‘तुमचा मुलगा नाही. जरा त्याला काही सांगा' अशी विनंती काही पालकांना केली तर तासाला येत त्यांनी मुलाचे नाव एका कॉलेजातून काढून दुसरीकडे घातले, असेही प्रकार घडलेले आहेत.