पान:आमची संस्कृती.pdf/172

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / १६५

विद्यार्थ्यांनी पुण्याच्या रस्त्यात एका वयस्कर प्रोफेसरांना मारले तरी विद्यापीठाने त्याची काहीच दखल घेतली नाही. ह्यावरून लवकरच उत्तरेकडील परिस्थिती इकडे येईल अशी भीती वाटते.

 विद्यार्थ्यांची व पालकांची बेपर्वाई
 मुलाना शिक्षण उत्तम मिळावे, मुलांनी परिश्रमपूर्वक शिकावे व ते काय शिकले ह्याची नीट चाचणी व्हावी अशी इच्छा असेल तर शिक्षणाबद्दल व शिक्षकांबद्दल समाजाची भावना आदराची व प्रेमाची पाहिजे, इतकेच नव्हे तर शिक्षकांशी सहकार्य झाले पाहिजे. चांगली परीक्षा म्हणजे कठीण परीक्षा व जितकी जास्त मुले नापास तितका शिक्षणाचा दर्जा उच्च हे समीकरण आम्हा शिक्षकांना कबूल नाही. पण विद्यायच्या व पालकांच्या म्हणजे पर्यायाने समाजाच्या बेपवईने तसे होते खरे.
 पुण्यातील फग्र्युसन कॉलेजातील इंटर सायन्सचा वर्ग उदाहरणा- दाखल घेऊ. त्या वर्गात एकंदर चारशे साडेचारशे विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थ्यांना वर्षभर वर्गात हजेरी द्यावयाची असते, प्रयोग करावयाचे असतातनिबंध लिहावयाचे असतात व तिमाही, सहामाही व नऊमाहीची परीक्षा झाली की वार्षिकला बसावयाचे फॉर्म दिले जातात. फॉर्म देताना हजेरी, प्रयोग, निबंधलेखन किती प्रमाणात आहे हे पाहून, त्या शिवाय झालेल्या तीन परीक्षांत मिळून एकेका विषयात निदान एकदा तरी पास झाले पाहिजे असा नियम आहे. हा नियम मोठा कठीण आहेअसे कोणीही म्हणणार नाही. जी मुले तिमाही व सहामाहीत नापास होतात त्यांच्या पालकांना मुलाचे मार्क पाठवून, तो अभ्यास करीत नाही, त्याला समज द्यावी' अशी विनंती करण्यात येते. फॉर्म मिळण्यासाठी काय नियम आहे हे विद्यार्थ्यांना वर्षारंभी व अधूनमधून सांगण्यात येते. चारशेपन्नासपैकी २५८ सर्व परीक्षांत सर्व विषयांत पास होते. १४९ सर्व परीक्षा मिळून एकएका विषयांत एकएकदा किंवा दोनदोनदा पास असे होते व ४३ असे निघाले की, ते कुठच्याही विषयात पास नाहीत. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की, ह्या ४३ त एकही मुलगी नाही. वर्गात मुलींची संख्या ४० वर आहेह्या ४३ तूनही ज्यांनी निबंध लिहिले होते,