पान:आमची संस्कृती.pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१६४ / आमची संस्कृती

बी.ए. किंवा एम.ए. झालेल्यांमधून येतात. ज्यांच्या हातात लहानापासून मोठी कामे असतात अशा लोकांना बरील त-हेचे शिक्षण मिळाले तर ते देशाच्या दृष्टीने निरुपयोगी आहे असे वाटत नाही. ह्या शिक्षणात इतिहास शिकताना प्राचीन व अर्वाचीन भारतावर जास्त वेळ खर्चावा, सांस्कृतिक इतिहास केवळ पाश्चिमात्यांच्या चष्म्यांतून शिकवला जातो तो भारतीय दृष्टीने शिकवावा असे व इतर तपशीलाबद्दल मतभेद होण्याचा संभव आहे. पण एकंदर जे शिक्षण मिळते ते व्यर्थ आहे ही ओरड योग्य वाटत नाही.

 राजकीय पक्षांचे प्रचारसाधन!
 शिक्षणाच्या विरुद्ध ओरड हेच एक विद्यार्थ्यांचे मन चाळवण्याचे कारण नसते. राजकीय पक्षांना थोड्या पैशांत मोठा प्रचार करायला विद्यार्थी हे एक अतिप्रभावी साधन असते. गेल्या वर्षी लखनौ विद्यापीठात स्टुडंटस- युनियनवरून जे मोठे भांडण झाले त्याची दखल दुर्दैवाने आपल्याकडील पुढा-यांनी घेतली नाही. पण त्याचे मूळ फारच उदबोधक आहे. तिकडे विद्याथ्र्यांचा एक संघ आहे. व त्यावर विद्यापीठाच्या अधिका-यांचे नियंत्रण व ढवळाढवळ नसावी हे विद्याथ्र्यांचे म्हणणे सकृतदर्शनी रास्त वाटते. पण विद्यार्थ्यांचे म्हणजे संघचालकांचे म्हणणे असे की, ह्या संघात प्रत्येक विद्यार्थ्याने आले पाहिजे, इतकेच नव्हे तर संघाची वार्षिक फी कॉलेजे व युनिव्हर्सिट्यांनी मुलांकडून शिक्षणाची फी गोळा करताना सक्तीने गोळा करून संघाच्या हवाली केली पाहिजे! अशा त-हेने हजारो रुपये फी गोळा होते व ती सेक्रेटरी व त्यांचे सूत्रचालक राजकीय पक्ष यांच्या ताब्यात जाऊन गुंडगिरी राजरोसपणे चालते. उत्तरेकडच्या ब-याच विद्यापीठांतून हे संघ अस्तित्वात आहेत व ते इतके बलवान आहेत की, कित्येक विद्याथ्र्यांना ह्या गोष्टीचा वीट आला असूनही मोठ्याने बोलण्याची सोय नाही. कारण लागलीच मारपीट होते. शिस्त, शिक्षण व परीक्षा- कशाच्याच बाबतीत नियंत्रण राहत नाही. मुले अभ्यास करीत नाहीत. चार उनाड मुलांना प्रश्नपत्रिका जड गेल्या की, भर मंडपातच मारामारी व आरडाओरडा सुरू होतो. मुलाला नापास केल्यावरून शिक्षकाला चोप व प्रसंगी शिक्षकाचा खूनही झाला आहे.अशी परिस्थिती सर्वस्वी येथे आली नाही. पण गेल्या वर्षी काही