पान:आमची संस्कृती.pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६० / आमची संस्कृती
आपल्या सहकाऱ्याकडून जरा वेळ मागून घेता येईल. पण खरा प्रकार असा असतो की, पुस्तकाच्या उणीवेची जाणीव फार उशीरा होते.

 सुट्या आणि अभ्यासेतर कार्यक्रम!
 कॉलेजातील अभ्यासक्रमांत एक मोठा अडथळा म्हणजे सुट्टयांचा असतो. विलायतेत रविवार ही सार्वत्रिक सुट्टी असते ती फक्त मिळते. एरवी अभ्यासाच्या कालखंडात (टर्ममध्ये) जवळजवळ सुट्टी नाहीच म्हटले तरी चालेल. त्यामुळे एक टर्ममध्ये किती व्याख्याने द्यावी व विषय कधी संपवावा त्याचा नीट अंदाज शिक्षकाला बांधता येतो. आपल्याकडे रविवारची विलायती सुटी सार्वत्रिक झालीच आहे, पण त्याशिवाय नित्यनैमित्तिक सुट्या इतक्या असतात की, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नाही. जसजसा अभ्यास वरच्या वर्गाचा, तसतसा सुट्यांमुळे अभ्यास जास्त बुडतो. रविवारची सुट्टी घेतली तर सणावाराच्या सुट्या काढून टाकल्या पाहिजेत. ह्या नित्य सुट्टया कधी आहेत त्याचा निदान अंदाज तरी असतो. पण नैमित्तिक सुट्यांना तर ताळच नाही! नैमित्तिक सुट्टयांत गॅदरिंग (कॉलेजचे, बी.ए.च्या मुलांचे, एम.ए.च्या मुलांचे अशी निरनिराळी) बॅचचा शेवटचा पदवीदान समारंभाचा दिवस, व नंतरचा दिवस, आंतर्विद्यालय सामन्यांचे दिवस, बक्षीससमारंभाचा दिवस, खेळात अजिंक्यपद मिळेल त्या कॉलेजाला आणखी एक दिवस- व कोणी मेल तर- अशा अनेक सुट्या केव्हा येतील ह्याचा नेमच नसतो. एम.ए.ला सर्व व्याख्याने सकाळी असतात. आठवड्यातून दर विद्यार्थ्याला बहुतेक फक्त चारच व्याख्याने असतात. काही प्रोफेसर चार दिवस फुकट जाणे नको (- गणेशखिंडीला जाण्या-येण्यात फार वेळ खर्च होतो-) म्हणून दोन दोन तास लागोपाठ घेतात. अशा वेळी सुट्टीमध्ये फार अभ्यास बुडतो. खरोखर एम.ए.ला एकही सुट्टी देण्याचे कारण नाही. कॉलेज २० जूनला सुरू होऊन समारे १५ ऑक्टोबरपर्यंत चालते व परत १० नोव्हेंबरपासून १५ मार्चपर्यत दुसरी सहामाही असते. ह्या हिशेबाने पहिल्या टर्मचे एकुण दिवस ११७ व नाताळची १४ दिवसांची सुट्टी काढून टाकली म्हणजे दुस-या टर्मर्च ११५ दिवस- असे शैक्षणिक वर्षांत एकंदर २२८ दिवस असतात. ह्यांतील सुमार मारे ३२ रविवार व २० ते २२ पुणे विद्यापीठाच्या सुट्टया