पान:आमची संस्कृती.pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५४ / आमची संस्कृती

लागतो. बाप किंवा भाऊ किंवा कुटुंबातील इतर कोणी जर आजारी असेल, तर रजा काढून कुटुंबाची अडचण आधी पाहावी लागते, अडीअडचणीला स्वयंपाकपाणीही करावे लागते. स्वत:च्या साराश काय संसाराचे सुख न मिळता संसाराचे ओझे मात्र त्यांना भरपूर वाहावे लागते! ज्या कोणी सुरुवातीला स्वतंत्रपणे राहतात त्यांना लवकरच एकाकी जीवनाचा कंटाळा येऊन त्या कोणीतरी मित्र जोडतात व त्याच्याशी लग्न करणे अशक्य असल्यास त्याचा संसार तोच आपला संसारह्या भावनेने त्याच्या कुटुंबात मिसळण्याचा प्रयत्न करीत असतात. हे सर्व सदा भुकावलेले अतृप्त जीव असतातलग्न झाल्यावर प्रेमाचा उन्माद ओसरून जीवनाचा ओघ परत संथपणे व सुखाच्या संसारात पूर्वापेक्षा खोलपणे वाहतो. तशी स्थिती प्रौढ कुमारिकांच्या व काही विधवांच्या आयुष्यात येत नाही. त्यांना मानसिक स्थैर्य नसते व त्याचा परिणाम संस्थेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना- सर्वांनाच भोगावा लागतो.
 जी स्थिती शिक्षकिणींची तीच डॉक्टरणी व नसावी. समाजात ह्या बायका पुढारी म्हणून गणल्या जातात व त्यांच्या अशांत अतृप्त जीवनाचे परिणाम सर्वच समाजावर होतातलग्न झालेल्या स्त्रियांना गर्भारपण व बाळंतपण ह्यासाठी जी रजा द्यावी लागेल ती टाळण्यासाठी संस्थांचे चालक मुख्यत्वेकरून कुमारांच्या व विधवांच्या अर्जाला आधी मान्यता देतात. पण वरील गोष्टी लक्षात घेऊन सर्वांना सारखी संधी द्यावी. लग्न झालेल्या स्त्रियांची सेवा परिणामी समाजास हितकारक ठरेल. संसार करूनही स्वतंत्र व्यवसाय करण्याची स्त्रियांना संधी द्यावी म्हणजे आपल्या आयुष्याच्या भरून चाललेल्या मधुघटांतून त्यांना इतरांचा अंतरात्मा तृप्त करता येईल. केवळ भुकेलेल्या हृदयाने काम करणान्यांच्या रिकाम्या भांड्याचे निनाद ऐकून समाजाला काय लाभ होणार? काहा स्त्रियांना लग्न करण्याची आवश्यकता वाटत नाही, इतरांच्या संसाराकडे त्या कधीच आसावलेल्या दृष्टीने पाहात नाहीत; त्यांनी संसाराच्या फंदात पडावे असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण मी सामान्य बहसंख्य बायकांची गोष्ट सांगते आहे. त्यांनी नोकरी करावयाची तर अनैसर्गिकरीत्या आयुष्य घालवले पाहिजे, असा निर्बाध जुलुमाचा नव्हे काय? <बर>  लग्न करावयाचे असल्यास अभ्यास शेवटास नेण्याचा किंवा धंद्याचा