पान:आमची संस्कृती.pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १५३


आयुष्यात भाग घेणे असेल तर प्रकृती उत्तम असणे अत्यावश्यक आहे. स्त्री-सौंदर्याची सध्याची कल्पना ह्या नव्या ध्येयाच्या चौकटीत बसण्यासारखी नाही. पुरुषांनी उपभोग्य वस्तू ह्या दृष्टीने स्त्रीसौंदर्याची कल्पना रेखाटलेली आहे. नाजूकपणा, असहायपणा हे गुण त्यांत मुख्यत्वेकरून येतात. दुर्दैवाने हल्लीच्या मुलींना पण हेच गुण विलोभनीय वाटतात. कारण त्यामुळे त्या मुलांना आकर्षण्यास समर्थ ठरतात. लठ्ठ होण्याच्या भीतीमुळे कमी खाऊन काटकुळे बनण्याची धडपड ब-याच मुलींची चाललेली असते. भरपूर खाऊन, व्यायाम करून अंगाबरोबर राहावे- कमी खाऊन नव्हे, हे काही त्यांच्या ध्यानात येत नाही. नाजूक गोरेपान दिसण्यापेक्षा काटकपणा, दमदारपणा व व्यायामामुळे आलेला सावळेपणा ह्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले पाहिजे. शरीरसंपत्ती ही एक आनुवंशिक गोष्ट म्हणजे देणगी आहे; पण ती कमावणे व वाढवणे प्रत्येकीचे कर्तव्य आहे.

 लग्नाचा प्रश्न
 ह्यानंतरचा पुढचा प्रश्न लग्नाचा. पुष्कळदा स्त्रियांपुढे लग्न की स्वतंत्र व्यवसाय असा प्रश्न असतो. हा नाही तर तो अशा दोन मार्गापैकी एकाचीच निवड करणे शक्य आहे, दोन्ही गोष्टी साधावयाच्या नाहीत, अशी सर्वसाधारण कल्पना आहे. लग्न करून संसार तरी कर, नाहीतर कुमारी राहून स्वतंत्र व्यवसाय तरी कर, अशा त-हेचा उपदेश नेहमी ऐकण्यात येतो. मास्तरणी, डॉक्टरणी वगैरे व्यवसायात पडलेल्या स्त्रियांमध्ये कुमारिकांना व विधवांना वर येण्यास जास्ती वाव मिळतो लग्न झालेल्या बायकांना पुष्कळदा लग्न झाले म्हणून नोकरी मिळण्याची पंचाईत पडते. मला वाटते, स्त्रियांच्या बाबतीत तर हा मोठा अन्या आहेच; पण सबंध समाजाचेही त्यामुळे नुकसान होते. विधवा । कुमारी स्त्रिया यांना संसाराचे बंधन नसते व त्यामुळे त्या संस्थेचे काम मन लावून करतात असे सांगण्यात येते, पण त्यात काडीइतकेही न शाळातून काम करणाच्या प्रौढ कुमारिका व विधवा ह्या बहुधा स्वतंत्र राहत नाहीत. त्या बापाच्या किंवा भावाच्या किंवा आसन्याने असतात व त्यांना बापाचा किंवा भावाचा संसार सावरावा