पान:आमची संस्कृती.pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५२ / आमची संस्कृती

शिष्याचा धंदा सर्वस्वी पुरुषांच्या हाती आहे; तो बायकांना करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. चित्रकलेच्या शिक्षकिणींची कितीतरी शाळांतून गरज आहेपण पुरेशा शिकलेल्या स्त्रिया हा विषय शिकवण्यास मिळत नाहीत. लघुलेखन, हिशेबतपासनीस व टंकलेखन हे विषयही स्त्रियांनी आत्मसात करण्यासारखे आहेत. देशी व विदेशी मेवामिठाई, पेढे, बफी, चॉकलेट, टॉफी वगैरे जिनसा थोड्या प्रमाणावर धंदेवाईकपणे करणे फायद्याचे आहे. लाकडाची व विशेषत: चिंध्यांची खेळणी बाजारात चांगली खपतील. शाळांतून गाणी शिकवण्यास . गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यास गायनशिक्षक म्हणून स्त्रियांना चांगली बहुधा मास्तर असतात नोकरी मिळण्यासारखी आहे. जास्त शिकलेल्या बायकांना लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करता येईलमाझ्या माहितीच्या शास्त्रीय उपकरणे करणाच्या कारखानदारांना आज कित्येक वर्षे स्त्रिया कारखान्यात शिकून तयार व्हाव्यात अशी इच्छा असूनही काम करण्यास शिकलेल्या स्त्रिया मिळत नाहीत. मुंबई येथील पारशी स्त्रियांच्या औद्योगिक शाळेत वर सांगितलेले बरेच व्यवसाय करून स्त्रिया पोटाला मिळवतातस्वत:चे पोट भरण्याची कला साध्य झाली म्हणजे स्त्रिया आपोआप स्वतंत्र होतील. बापाच्या संपत्तीत वाटा मिळण्यापेक्षा असले शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या काळी मिळवते मुलगे लग्न करून स्वतंत्र संसार थाटतात. अशा संसारात मुलगा जितका स्वतःच्या आईबापांना पारखा होतो तितक्याच मुली पण होतात. मुली दुसच्या घरी स्वत न जाता :चे घर करतात. ह्या घरी मुलाचे आईबाप व मुलींचे आईबाप दोन्हीही पाहुणच तेव्हा मुली दुसर्या घरी जाणाच्या म्हणून माहेरी त्यांना मुलांपेक्षा निराळ वागविण्याची वास्तविक काही जरूरी नाही. जे शिक्षण मुलांना तेच त्याना जी वागणूक मुलांशी तीच त्यांच्याशी, अशी वृत्ती आईबापांनी ठेबला पाहिजे.

 स्त्रियांचे सौंदर्य
 शिक्षणाचे वय हेच शरीरसंवर्धनाचे वय आहेकेवळ शारीरिकदृष्टया पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त ताण सहन करावा लागतो. त्या दृष्टीने त्यांचा तयारीही तशीच पाहिजे. विशेषतः स्वत:चा संसार करून सार्वजनिक