पान:आमची संस्कृती.pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती /१५१


भावनाशीलही होतात. विशेष कारण नसता त्यांचे हसणे, रडणे सुरू असते. बाल्यातून तारुण्यात येताना शरीरात जी स्थित्यंतरे होत असताना त्याचा हा परिणाम असतो. ह्या वेळी शाळेत त्यांना विशेष काळजीपूर्वक वागवले पाहिजे. तशी वागणूक त्यांना मुलांच्या शाळेत तर मुळीच मिळत नाही. मुलामुलींच्या शाळेत काही सृष्ट वस्तूचे व ऐतिहासक घडामोडींचे ज्ञान मिळवण्याखेरीज मुलींचा काडीइतकाही फायदा होत नाही. बरोबरीच्या मुलींशी मैत्री, खेळांत व अभ्यासात चढाओढी, शाळेतल्या सार्वजनिक आयुष्यात भाग घेण्याची संधी ह्या सर्वांना त्या मुकतात मुलींना स्थळ बघताना त्यांचे प्रदर्शन करण्याची चाल आहे; पण आमच्या इकडच्या सहशिक्षण संस्थांतून हे मुक्या मेणबाहुल्यांचे प्रदर्शन प्रत्यही चाललेले असते. ह्या प्रदर्शनात बिचाच्या काळ्यासावळ्या मुलींचे जे हाल होतात ते विचारूच नये.
 फर्ग्युसन कॉलेजात आमच्याबरोबरीच्या एका मुलीला वर्गात पाऊल टाकल्याबरोबर, ‘अरे, ढग आले ढग! अंधार पडला अंधार! ह्या शब्दांची पहिली सलामी मिळत असे. ह्याउलट, एखादी सुंदर मुलगी वर्गात आली की, मुले अक्षरश: मिटक्या मारण्यास सुरुवात करतात. ह्या शिक्षणापासून मुलींचा काय फायदा होत असेल ते परमेश्वराला ठाऊक!
.
 मुलींचे शिक्षण
 मुलींचे शिक्षण त्यांच्या पोटासाठी आहे ही भावना नसल्यामुळे ते कसे काय आहे ह्याची चौकशीच होत नाही. प्रत्येकीला शिक्षण आवश्यक आहेत्यापुढील शिक्षणात एक तरी विषय त्यांना काही घोटाचा व्यवसाय करता येईल असा शिकवावा. प्रत्येकीने मॅट्रिक होऊन कॉलेजात जावयाचे त्यापेक्षा श्रीमंत किंवा पुस्तकी शिक्षणात हुशार मुलींनीच ह्या शिक्षणक्रमात पडावे. बाकीच्यांनी सर्वसाधारण मॅट्रिकइतके शिक्षण घेऊन एखादा धंदा शिकावा. पुरुष करतात त्यांपैकी कोणताही धंदा स्त्रियांना करण्यास हरकत नसावी. बर्याच धंद्यांत पडण्यास स्त्रियांना जरा अवकाश लागेल: पण अगदी आजसुद्धा ज्यांचे शिक्षण घेता येईल असे धंदे पुष्कळ आहेत. मुंबई, सुरत, अहमदाबाद ह्या शहरांतून रेशमाचे व जिगाचे भरतकाम स्त्रियाच करतात.