पान:आमची संस्कृती.pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५० / आमची संस्कृती
घेऊ शकत नाहीत. पांढरपेशा मुलींना मिळते तितके शिक्षण ह्या बायकांना मिळाले तर त्या स्त्रियांचे समाजातील स्थान खास बदलतील.

 शहरातील मुली
 शहरातल्या मुली साधारणपणे मुलांच्याबरोबर शिकू लागतात. हल्ली बच्याच मुली मुलांच्या शाळेत जातात; पण तेथे त्यांना वागवण्याची पद्धत पाहिली म्हणजे अगदी चीड येते. काही एकदोन शाळा वगळल्यास कोठल्याही शाळेत अगदी लहान मुला-मुलींनासुद्धा सरमिसळ एकत्र बसू देत नाहीत. पुण्याच्या एका शाळेत तर एकाच वर्गातील मुला-मुलींना हजेरीपट निरनिराळा ठेवून त्यांचे नंबरही निरनिराळे लावतात! जी मुले मुली घरी एकत्र खेळतात आणि आणि मिळून शाळेत जातात त्यांचे शाळेचे दारांतून आत गेल्यावर भाषण नाही. आमच्या शेजारच्या एका दहा वर्षांच्या मुलाने आपल्या ओळखीच्या मुलीकडून एकदा पेन्सिल मागितली, तर अमक्या-तमक्याच्या मुलीचा मित्र म्हणून वर्गातील मुलांनी संध्याकाळपर्यंत त्याला रडकुंडीस आणले!
 माझा पुतण्या न पुतणी एकाच शाळेत जात असत. शाळेजवळ येईपर्यंत दोन्ही भावंडे मजेत हसतखेळत जात; पण शाळा जवळ आली की भावाने बहिणीला बजावून सांगायचे, की ‘अक्का, शाळेत माझ्याशी बोलता कामा नयेस हं! आणि दादा, दादा म्हणून हाक मारू नकोस. शाळा सुटली की इथे रस्त्यावर मी तुझी वाट पहात उभा राहीन.
 हायस्कुलातील तऱ्हा हि ह्यापेक्षा अजब असते. मुलींची बसावयाची बाके अर्थातच निराळी असतात. मुले तर त्यांच्याशी बोलत नाहीतच, पण मास्तरही जणू काही मुली वर्गात नाहीत असे वागतात. प्रश्न विचारायचे ते फक्त मुलांना, अभ्यास पाहावयाचा तो फक्त मुलांचा! ‘आम्हाला तेवढ भारतात! आणि ह्या मुली फिदीफिदी हसत असतात!' अशी तक्रार एक लहान मुलगा आपल्या आईशी करीत होता. वरच्या वर्गातून मुलींना हे शिक्षेचे प्रसंग पाहून चोरट्यासारखे होते. अकराबारा वषपयत मुलामुलींची वाढ सारखीच होत असते. मुली मुलांच्या मानाने लवकर वयात येतात. चवदा पंधरा वर्षांच्या मुली त्याच वयाच्या मुलांच्या मानान जास्त समजूतदार असतात. त्याचप्रमाणे त्या वयात त्या जास्त