पान:आमची संस्कृती.pdf/154

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / १४७

वाटा उचलीतइतके असूनही त्यांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा नाही. धार्मिक समारंभात त्यांना मुळीच भाग घेण्याची परवानगी नाही. बहुतेक सर्व समाजांतून पुरुषाला वाटेल तेव्हा बायकोला काडीमोड देता येते- पण मुले व भांडीकुंडी ह्यांवर तिचा हक्क राहतो. धार्मिक गोष्टींत स्त्रियांना भाग घेण्यास मिळत नाही, ते त्यांच्या विशिष्ट शरीरधर्मामुळे असावे असा कयास आहे. काही समाजातून बायका म्हाताच्या झाल्या म्हणजे त्याना धार्मिक कृत्ये करण्याची मोकळीक असते.

 तीन अडचणी
 जोपर्यंत शेती हाताने करावयाची असे तोवर शेतीपासून होणारे उत्पन्न कुटुंबाला पुरेसे पडत नसे. पुरुषाला अधूनमधून का होईना, शिकार व मच्छीमार करावी लागत असे. अस्वल, हरण, वनमायरानरेडे ह्यांची शिकार करणे म्हणजे अत्यंत परिश्रमाचे काम असते. दहा हातांवरून मारावयाचा भाला किंवा पन्नास हातावरून मारावयाचे धनुष्यबाण एवढीच सामग्री शिकाच्याजवळ असते. जनावरामागे वीसवीसपंचवीसपंचवीस मैल पळत जावे लागते व जनावर थकले म्हणजे पाच दहा जणांनी हल्ला करून ते मारावे लागते. अशा शिकारीनंतर घरी आल्यावर काही काम केले नाही तर पुरुषाला दोष देण्यात अर्थ नाही.
 उत्पादनाची साधने सुधारल्यावर शिकार टाकून पुरुषांनी शेतीचे काम उचलले. जनावरे हाकणे, त्यांची जोपासना करणे वगैरे कामे बहुधा पुरुषच करीत. हळूहळू उत्पादनाचे सर्वच प्रकार पुरुषांनी काबीज केले व आज तर मुले होण्याखेरीज बायकाच करू शकतील असे एकही काम जगात उरलेले नाही. गर्भारपण व बाळंतपण ह्या काळात थोडा वेळ का होईना शारीरिक दुर्बलतेमुळे रक्षण व पोषण ह्यांसाठी स्त्रियांना दुसर्यांवर अवलंबून राहावे लागतेतान्ह्या मुलाच्या जोपासनेच्या जबाबदारीमुळे घर टाकून फार वेळ दूर जाता येत नाही, हे बांझ गेली तिथे संध्याकाळ झाली’ ह्या म्हणीत सांगितले आहेस्त्रिया व मुले ह्यांचा एक स्थानिक गट बनतो. मासिक स्रावाबद्दल वाटणाच्या शिसारीमुळे व भीतीमुळे स्त्रियांना धर्मकृत्यांत भाग घेण्याची बंदी झाली आणि उत्पादनाचे कार्य कमी कमी होत गेल्यामुळे संपत्तीवरील हकही नाहीसे झाले. ह्या व इतर कारणांमुळे स्त्रियांना सध्याचा